शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

अॅपच्या माध्यमातून भरता येणार इन्कम टॅक्स

By admin | Updated: February 15, 2017 17:02 IST

येत्या काळात काही वेळातच तुम्ही कायम खाते क्रमांक (पॅन) प्राप्त करू शकता.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 15 - येत्या काही दिवसांत मिनिटांमध्ये तुम्ही तुमचे कायम खाते क्रमांक (पॅन) प्राप्त करू शकणार आहात. इतकेच नव्हे तर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनच्या माध्यमातून प्राप्तिकरही भरू शकता. करदात्यांचं आयुष्य सोपं करण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड(सीबीडीटी) ई-केवायसीच्या माध्यमातून रिअल टाइम बेसिसवर तात्काळ पॅन उपलब्ध होण्यासाठी काम करत आहे. ई-केवायसीशी संबंधित व्यक्तीचा पत्ता आणि वैयक्तिक माहितीची खातरजमा करता येते. एका अधिका-यानं सांगितलं की, ई-केवायसीद्वारे एक सिम कार्ड दिल्यास तशा प्रकारे पॅनही जारी केलं जाऊ शकतं. त्यामुळे पॅन मिळण्याचा कालावधी दोन ते तीन आठवड्यांवरून 5 ते 6 मिनिटांपर्यंत येऊ शकतो. या प्रक्रियेच्या माध्यमातून नंबर तात्काळ मिळणार असून, कार्ड नंतर घरपोच मिळणार आहे. सीबीडीटी आणि कंपन्यांशी संबंधित असलेल्या मंत्रालयानं नव्या कंपन्यांना एका फॉर्मच्या माध्यमातून चार तासांत पॅन जारी करण्यासाठी करार केला आहे. पॅन तात्काळ मिळावं, असा त्या पाठीमागे उद्देश असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कंपन्यांची व्यावसायिकरीत्या ओळखीची संख्याही समजणार आहे. कर विभागानं एक अॅप डेव्हलप केल्यानं कर भरण्यासाठी त्याची मदत होणार आहे. या अॅपमध्ये पॅनसाठी अर्ज केल्यास रिटर्नच्या ताज्या माहितीसह देवाण-घेवाणीसारख्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. कर विभाग स्वतःच्या पोर्टलच्या माध्यमातून ब-याच सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या अॅपमुळे वरिष्ठ नागरिकांसोबतच तरुण करदात्यांसाठी आयुष्य सोपं होणार आहे. डायरेक्टरेट ऑफ सिस्टीम सीबीडीटीच्या दोन प्रोजेक्टवर काम सुरू आहे.