शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शेती उत्पन्नावर आयकर लावण्याचा विचार नाही - जेटली

By admin | Updated: April 27, 2017 01:18 IST

शेतीतून येणाऱ्या उत्पन्नावर कोणत्याही प्रकारचा आयकर लावण्याचा केंद्र सरकारचा विचार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केले.

नवी दिल्ली : शेतीतून येणाऱ्या उत्पन्नावर कोणत्याही प्रकारचा आयकर लावण्याचा केंद्र सरकारचा विचार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केले.निती आयोगाचे सदस्य विवेक देवरॉय यांनी शेतीतील उत्पन्नावर कर लावण्याची सूचना काल केली होती. कराचा आधार वाढविण्यासाठी विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त शेती उत्पन्नावर कर लावण्यात यावा, असे त्यांनी म्हटले होते. यावर वित्तमंत्र्यांनी तातडीने टिष्ट्वट करून खुलासा केला आहे. जेटली म्हणाले की, मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, शेती उत्पन्नावर कोणत्याही प्रकारे कर लावण्याचा केंद्र सरकारचा विचार नाही. घटनेने राज्य आणि केंद्र सरकारमध्ये केलेल्या अधिकारांच्या वाटणीनुसार शेती उत्पन्नावर कर लावण्याचा अधिकारच केंद्र सरकारला नाही. शेतीतील उत्पन्न हा अत्यंत संवेदनशील विषय असून, त्यावर कर लावण्याचे आजपर्यंत सर्वच सरकारांनी टाळले आहे. २२ मार्च रोजी जेटली यांनी संसदेत यासंबंधीचा स्पष्ट खुलासा करून शेती उत्पन्नावर कर लावला जाणार नसल्याचे नमूद केले होते.वक्तव्यापासून दूरशेती उत्पन्नावर कर लावण्याच्या बिबेक देबरॉय यांच्या सूचनेपासून निती आयोगाने स्वत:ला दूर केले आहे. देबरॉय हे निती आयोगाचे सदस्य आहेत, त्यामुळे आयोगाचीच ही भूमिका नाही ना, असा संभ्रम निर्माण झाला होता. तो आयोगाने दूर केला आहे. देबरॉय यांनी व्यक्त केलेले वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक मत आहे, असा खुलासा निती आयोगाने एक निवेदन जारी करून केला आहेनिती आयोगाच्या तीन वर्षांच्या कृती आराखड्यात शेती उत्पन्नावर कर लावण्याची तरतूद असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. याचाही आयोगाने इन्कार केला आहे. आयोगाने म्हटले की, शेती उत्पन्नावर कर लावण्यात यावा अशी कोणतीही शिफारस आयोगाने केलेली नाही.