अंतिम पैसेवारीत १२९५ गावांचा समावेश प्रस्ताव रवाना : २०६ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त
By admin | Updated: December 16, 2015 23:49 IST
जळगाव : जिल्ातील १५ तालुक्यांमधील १५०१ गावांच्या हंगामी (नजर) पैसेवारीनंतर आता अंतिम पैसेवारीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनातर्फे तयार करण्यात आला आहे. यात १२९५ गावांची पैसेवारी ही ५० पैशांच्या आत आहे. तर २०६ गावांची पैसेवारी ही ५० पैशांपेक्षा जास्त आहे.
अंतिम पैसेवारीत १२९५ गावांचा समावेश प्रस्ताव रवाना : २०६ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त
जळगाव : जिल्ातील १५ तालुक्यांमधील १५०१ गावांच्या हंगामी (नजर) पैसेवारीनंतर आता अंतिम पैसेवारीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनातर्फे तयार करण्यात आला आहे. यात १२९५ गावांची पैसेवारी ही ५० पैशांच्या आत आहे. तर २०६ गावांची पैसेवारी ही ५० पैशांपेक्षा जास्त आहे.जिल्हा प्रशासनातर्फे १५ सप्टेंबर रोजी हंगामी (नजर) पैसेवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर राज्यशासनाने दृष्काळसदृष्य गावांची घोषणा केली होती. १५ डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासनाने अंतिम पैसेवारी जाहीर केली. त्यात मुक्ताईनगर तालुक्यातील काही गावांची वाढ झाली आहे. तालुकानिहाय गावांची संख्या पुढीलप्रमाणेजळगाव तालुक्यातील ९२, जामनेर १५२, एरंडोल ६५, धरणगाव ८९, भुसावळ ५४, यावल १०, रावेर १९, मुक्ताईनगर ८१, बोदवड ५१, पाचोरा १२८, चाळीसगाव १३६, भडगाव ६३, अमळनेर १५४, पारोळा ११४, चोपडा ८७ या गावांचा समावेश आहे.चोपडा, यावल व रावेर तालुक्यातील गावांची संख्या जास्तअंतिम पैसेवारीत रावेर तालुक्यातील १०२, यावल तालुक्यातील ७४, चोपडा तालुक्यातील ३० गावांची अंतिम पैसेवारी ही ५० पैशांपेक्षा जास्त आहे. जिल्हा प्रशासनाने या संदर्भातील एकत्रित अहवाल शासनाकडे पाठविला आहे. त्याबाबत लवकरच निर्णय होऊन दुष्काळाची अधिकृत घोषणा होणार आहे.