शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘एमआरपी’मध्येच जीएसटी समाविष्ट करा, मंत्रिगटाची शिफारस, अनेक ठिकाणी ग्राहकांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:25 IST

वस्तूच्या कमाल किरकोळ विक्री किमतीत (एमआरपी) वस्तू व सेवा कराचा (जीएसटी) समावेश करणे बंधनकारक करण्याची शिफारस राज्य सरकारांच्या वित्तमंत्र्यांच्या एका गटाने केली आहे.

नवी दिल्ली : वस्तूच्या कमाल किरकोळ विक्री किमतीत (एमआरपी) वस्तू व सेवा कराचा (जीएसटी) समावेश करणे बंधनकारक करण्याची शिफारस राज्य सरकारांच्या वित्तमंत्र्यांच्या एका गटाने केली आहे.आसामचे वित्तमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिगटाने जीएसटी परिषदेला दिलेल्या अहवालात ही शिफारस केली आहे. अनेक व्यावसायिक एमआरपीवर जीएसटी लावून अधिकची रक्कम ग्राहकांकडून उकळीत असल्याच्या तक्रारी अनेक राज्यांतून येत आहेत. या पार्श्वभूमीवर ही शिफारस करण्यात आली आहे.मंत्रिगटाने म्हटले की, छोटे आणि मध्यम व्यावसायिक यांच्यावरील जीएसटीच्या अंमलबजावणीचे ओझे कमी करण्यासाठी सरकारने एमआरपीविषयक ठोस नियम बनवणे आवश्यक आहे. कोणत्याही वस्तूची कमाल किंमत ही जीएसटी कर गृहीत धरूनच ठरविली जावी. जास्त पैसे आकारणे हा गुन्हा ठरविण्यात यावा.सूत्रांनी सांगितले की, काही व्यावसायिक जीएसटीचा गैरफायदा घेऊन ग्राहकांची लूटमार करीत आहेत. त्यामुळे एमआरपीचा नियम ठरविणे आवश्यक आहे. हा नियम रेस्टॉरंट, खाद्यवस्तू विक्रेते, मॉल, बाटलीबंद पेये यांनाही लागू करायला हवा. यातील अनेक ठिकाणी एमआरपीवर जीएसटी लावला जात आहे. सूत्रांनी सांगितले की, आम्ही केलेल्या सूचनेनुसार, एमआरपीमध्ये जीएसटी समाविष्ट केला तरी, विक्रेते जीएसटी विवरणपत्र जेव्हा भरतील, तेव्हा विक्री किंमत आणि जीएसटी हे स्वतंत्रपणे दाखवून पावत्या लोड करू शकतील.विवरणपत्राची प्रक्रिया सोपी करामंत्रिगटाने इतरही काही महत्त्वपूर्ण शिफारशी केल्या आहेत. उशिराने भरलेल्या जीएसटी विवरणपत्रावरील विलंब शुल्क प्रतिदिन १00 रुपयांवरून ५0 रुपये करावे, १.५ कोटींपर्यंत उलाढाल असलेल्या करदात्यांना देण्यात आलेली तीन महिन्यांतून एकदा विवरणपत्र भरण्याची सवलत सर्वच करदात्यांना देण्यात यावी, विवरणपत्र भरण्याची प्रक्रिया अधिक सोपी करण्यात यावी इत्यादी शिफारशींचा त्यात समावेश आहे. एचएसएन कोड आणि इन्व्हाईस मॅचिंगही अधिक सोपे करण्याची गरज असल्याचेही मंत्रिगटाने म्हटले आहे.

टॅग्स :GSTजीएसटी