धक्का दिल्याच्या रागातून तरुणाची हत्या विक्रोळीतील घटना : ५ हल्लेखोर गजाआड
By admin | Updated: August 8, 2015 00:23 IST
धक्का दिल्याच्या रागातून तरुणाची हत्या
धक्का दिल्याच्या रागातून तरुणाची हत्या विक्रोळीतील घटना : ५ हल्लेखोर गजाआड
धक्का दिल्याच्या रागातून तरुणाची हत्याविक्रोळीतील घटना : ५ हल्लेखोर गजाआडमुंबई: टपरीवर सिगरेट खरेदीसाठी गेले असताना टपरी जवळील टवाळखोरांना धक्का लागल्याच्या रागातून तरुणाची हत्या झाल्याची घटना विक्रोळीत घडली. शिवनंद तुकाराम दुधभाते (३१) असे मृत तरुणाचे नाव आहे.याप्रकरणी सन्नी सुरेश केदारे, रोशन उल्हास कांचन, मयुर भवानी शंकर ओझा, निखिल बापू वाघमारे व संदीप बळीराम कराड यांना पोलिसांना अटक केली असून त्यांच्याविरोधात हत्येच्या गुन्ा दाखल करण्यात आला आहे. विक्रोळी पूर्वेकडील टागोर नगर परिसरात दुधभाते कुटुंबियांसोबत राहण्यास आहे. खाजगी कंपनीत तो नोकरीला होता. गेल्या दोन महिन्यांपासून तो घरीच होता. गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास त्याचा मित्र सचिन बळीराम दामटे आणि सचिन शेेेसोबत त्याची घराशेजारी दारुपार्टी रंगली होती. तेव्हा सिगरेट आणण्यासाठी तो जवळच्या टपरीवर गेला. मात्र तेथे आधीच दोन ते तीन तरुण दारुच्या नशेत टिंगलटवाळी करत असताना दुधभातेचा या तरुणांना धक्का लागला. हा राग मनात धरत या तरुणांनी दुधभातेला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यातील एकाने त्याचा गळा आवळल्याने त्याचा मृत्यू झाला. नागरिक जमातहेत हे पाहून आरोपींनीही पळ काढला.यामध्ये स्थानिकांच्या मदतीने दुधभातेला तत्काळ जवळच्या महात्मा फुले रुग्णालयात नेले. दाखल करण्यापूर्वीच तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी तीन अनोळखी इसमांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी या आरोपींना अटक केली. (प्रतिनिधी)