शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

क्षुल्लक कारणावरून दोन गटात हाणामारी जोशी पेठेतील रात्रीची घटना : पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने निवळला तणाव

By admin | Updated: April 19, 2016 00:49 IST

जळगाव : येथील जोशी पेठ भागात रविवारी रात्रीच्या सुमारास ऑटोरिक्षाचा हॉर्न वाजविल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन गटात हाणामारी होऊन तणाव निर्माण झाल्याची घटना घडली़ या घटनेमुळे परिसरात रात्रीच्या सुमारास पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

जळगाव : येथील जोशी पेठ भागात रविवारी रात्रीच्या सुमारास ऑटोरिक्षाचा हॉर्न वाजविल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन गटात हाणामारी होऊन तणाव निर्माण झाल्याची घटना घडली़ या घटनेमुळे परिसरात रात्रीच्या सुमारास पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जोशीपेठेतील रहिवासी ऑटोरिक्षाचालक किशोर बाबुराव चौधरी (वय ४०) हे रविवारी रात्रीच्या सुमारास जोशीपेठेत आल्यानंतर त्यांनी रिक्षाचा हॉर्न वाजविला. या गोष्टीचा राग आल्याने तेथील नटू खाटीक, अझहर खाटीक यांनी रिक्षाचा हॉर्न का वाजविला? अशी विचारणा करीत चौधरी यांच्याशी वाद घातला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. या घटनेत किशोर चौधरी यांना फायटरने मारहाण झाल्याने त्यांना दुखापत झाली. ही घटना जोशी पेठेतील शैलेंद्र प्रोव्हिजन जवळ घडली़ घटनेची माहिती कळताच शनिपेठ पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांनी घटनास्थळी जात परिस्थिती आटोक्यात आणली. या घटनेमुळे जोशी पेठ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलीस पहाटेपर्यंत घटनास्थळी ठाण मांडून होते. या घटनेसंदर्भात किशोर चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील संशयितांविरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल अशोक महाजन करीत आहेत.
तिघांची चौकशी
दरम्यान, या घटनेनंतर सोमवारी शनिपेठ पोलिसांनी सकाळच्या सुमारास तीन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.