सासूला मारायला आला अन् मेव्हणीवरच वार केला नेहरु नगरमधील घटना : भावाच्या पत्नीस नांदवण्यास पाठवत नसल्याचा राग
By admin | Updated: April 26, 2016 23:11 IST
जळगाव: भावाच्या पत्नीस नांदवण्यास पाठवत नसल्याचा राग मनाशी धरून सासूला जिवंत मारण्याच्या उद्देशाने आलेल्या जावायाने सासू समजून भावाच्या पत्नीवरच झोपलेल्या अवस्थेत चाकूने मानेवर वार केल्याची घटना मंगळवारी पहाटे साडे तीन वाजता नेहरू नगरातील गुंजन मंगल कार्यालयाजवळ घडली. यात अनिता कैलास गायकवाड (वय ३०) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
सासूला मारायला आला अन् मेव्हणीवरच वार केला नेहरु नगरमधील घटना : भावाच्या पत्नीस नांदवण्यास पाठवत नसल्याचा राग
जळगाव: भावाच्या पत्नीस नांदवण्यास पाठवत नसल्याचा राग मनाशी धरून सासूला जिवंत मारण्याच्या उद्देशाने आलेल्या जावायाने सासू समजून भावाच्या पत्नीवरच झोपलेल्या अवस्थेत चाकूने मानेवर वार केल्याची घटना मंगळवारी पहाटे साडे तीन वाजता नेहरू नगरातील गुंजन मंगल कार्यालयाजवळ घडली. यात अनिता कैलास गायकवाड (वय ३०) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.नेहरू नगरातील राधाबाई हरिचंद्र पाचंगे यांची अनिता व मोठी मुलगी अहमदाबादला दिलेली आहे. मोठ्या मुलीचा राजू शिवाजी गायकवाड याच्याशी तर लहान अनिताचा कैलास गायकवाड याच्याशी विवाह झाला आहे. सासरच्यांकडून होणार्या त्रासामुळे राधाबाई यांनी अनिताला माहेरीच ठेवून घेतले आहे. अनिता हिला नांदवण्यास पाठवावे म्हणून राजू गायकवाड याचा सासू राधाबाई यांच्याशी वाद झाला होता. त्याने राधाबाईला जिवंत मारण्याची धमकीही दिली होती. पहाटेच्या सुमारास आला जळगावातराधाबाई व अनिता हे परिवारासह घरात झोपलेले असताना राजू शिवाजी गायकवाड हा पहाटे तीन वाजता राधाबाईला मारण्यासाठी चाकू घेऊन घरात घुसला. राधाबाई समजून त्याने अनितावरच हल्ला केला. मानेवर जोरदार हल्ला झाल्याने घरातील सर्व जण जागे झाले. चुकून अनितावर वार झाल्याचे लक्षात आल्यानंतर राजूने तेथून पळ काढला. यावेळी तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने तिचा जबाब घेता आला नसल्याचे उपनिरीक्षक जगदीश देवरे यांनी सांगितले.