शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

आरोपीकडून पोलीस उपनिरीक्षकावर प्राणघातक हल्ला केडगाव येथील घटना: रिव्हॉल्वर पळविले

By admin | Updated: July 10, 2015 23:13 IST

अहमदनगर: नगर महाविद्यालय आवारातील मारहाण प्रकरणातील आरोपी किरण कदम यास पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपीसह त्याच्या साथीदारांनी अचानक तुफान दगडफेक करत पोलीस उपनिरीक्षक राजेश हिंगोले यांचे रिव्हॉल्वर पळविले़ दरम्यान यावेळी झालेल्या झटापटीत पसार झालेला आरोपी कदम यास जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले असून, दगडफेकीत जखमी हिंगोले यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात रात्री उशिराने दाखल करण्यात आले़ या घटनेने केडगाव परिसरात खळबळ उडाली आहे़

अहमदनगर: नगर महाविद्यालय आवारातील मारहाण प्रकरणातील आरोपी किरण कदम यास पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपीसह त्याच्या साथीदारांनी अचानक तुफान दगडफेक करत पोलीस उपनिरीक्षक राजेश हिंगोले यांचे रिव्हॉल्वर पळविले़ दरम्यान यावेळी झालेल्या झटापटीत पसार झालेला आरोपी कदम यास जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले असून, दगडफेकीत जखमी हिंगोले यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात रात्री उशिराने दाखल करण्यात आले़ या घटनेने केडगाव परिसरात खळबळ उडाली आहे़
येथील नगर महाविद्यालयात तीन दिवसांपूर्वी दोन गटात जबर मारहाण झाली होती़ तेव्हापासून या प्रकरणातील आरोपी कदम याच्या पोलीस मागावर होते़ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संजयकुमार सोनी व राजेश हिंगोले यांच्यासह पोलीस पथकाने कदम यास पकडण्यासाठी केडगाव येथील रेणुकामाता मंदिर परिसरात सापळा लावला़ पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपीला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले़ ते आरोपीला घेऊन येत असतानाच मंदिर परिसरातून अज्ञात व्यक्तींनी अंधाराचा गैरफायदा घेऊन पोलिसांवर तुफान दगडफेक केली़ पोलिसांनी दगडफेक करणार्‍यांकडे मोर्चा वळविला़ मात्र त्याचवेळी आरोपी कदम याने पळून जाण्याचा प्रयत्न केला़ तो पोलिसांच्या तावडीतून निसटला़ तेवढ्यात आरोपीच्या साथीदाराने हिंगोले यांचे रिव्हॉल्वर हिसकावून पळ काढला़ यावेळी झालेल्या झटापटीत हिंगोले यांच्या डोक्याला मार लागला़ ते जखमी झाले़ मात्र सोनी यांच्या मदतीने त्यांनी आरोपी कदम याच्यासह त्याच्या साथीदारांना जेरबंद केले़ जखमी हिंगोले यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती़