शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

संततधार पाऊस, पुराने पूर्व अरुणाचल अंधारात

By admin | Updated: May 13, 2014 04:46 IST

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पूर आणि भूस्खलन झाल्याने अरुणाचल प्रदेशच्या पूर्व जिल्ह्याचा वीजपुरवठा आणि भूसंपर्क खंडित झाला आहे.

 इटानगर : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पूर आणि भूस्खलन झाल्याने अरुणाचल प्रदेशच्या पूर्व जिल्ह्याचा वीजपुरवठा आणि भूसंपर्क खंडित झाला आहे. पूर, भूस्खलनामुळे गेल्या पाच दिवसांपासून चीन सीमेला लागून असलेला अनजाव जिल्हा राज्याच्या इतर भागापासून तुटलेला आहे. खुपा आणि हायुलियांगमधील स्वामी कॅम्प येथील पूल आणि रस्त्याचा काही भाग वाहून गेला आहे. जिल्ह्यातील मोमपाणी आणि टिडिंग परिसरात प्रचंड प्रमाणात भूस्खलन झाल्याने जिल्ह्याचा भूसंपर्क तुटला आहे. लोहित जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तेझू आणि टिनसुकिया (आसाम)मधील वाहतूक विस्कळीत झाली आहे. लोहित नदी आणि तिच्या उपनद्यांची पातळी वाढत असल्याने जिल्ह्यात पूर धोका संभवतो आहे. जिल्हा प्रशासनाने प्रत्येक सीमेवरील वस्त्यांना, प्रशासकीय कार्यालय आणि नोडल विभागाला परिस्थितीबद्दल सतर्क केले आहे. उपायुक्त बी.एम. मिश्रा यांनी जिल्ह्यातील अतिसंवेदनशील आणि सखल भागात गस्त घालण्याचे निर्देश अधिकार्‍यांना दिले. संततधार पावसामुळे ३३ केव्ही वीजतारेचे नुकसान झाले; तसेच अनेक वीजखांब वाहून गेल्याने तेझू गावात काळोख पसरला आहे. (वृत्तसंस्था)