पोलीस दलाच्या सबसीडीअरी कॅन्टीनचे उद्घाटन
By admin | Updated: March 11, 2016 22:24 IST
जळगाव: जिल्हा पोलीस दलाने सुरु केलेल्या पोलीस सबसीडीअरी कॅन्टीनचे उद्घाटन शुक्रवारी विशेष पोलीस महानिरीक्षक विनय चौबे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, संदीप जाधव, उपअधीक्षक महारु पाटील, प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक रमेश बरकते व प्रभारी अधिकारी उपस्थित होते.
पोलीस दलाच्या सबसीडीअरी कॅन्टीनचे उद्घाटन
जळगाव: जिल्हा पोलीस दलाने सुरु केलेल्या पोलीस सबसीडीअरी कॅन्टीनचे उद्घाटन शुक्रवारी विशेष पोलीस महानिरीक्षक विनय चौबे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, संदीप जाधव, उपअधीक्षक महारु पाटील, प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक रमेश बरकते व प्रभारी अधिकारी उपस्थित होते.इलेक्ट्रीक वस्तू वगळता प्रत्येक कर्मचार्याला आठ हजार रुपयांची खरेदी यात करता येणार आहे. दरमहा २० ते २२ लाख रुपयांची विक्री होते. खर्च-वजा जाता झालेला नफा हा वेलफेयरमध्ये जमा केला जातो. हिंदुस्थान युनिलीव्हर कंपनीशी करार करण्यात आला आहे. त्यामुळे कंपनीने साडे तीन लाख रुपये खर्चून रॅक तयार केला आहे. कॅन्टीनच्या बाहेर व आतमध्ये अकरा सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. वेलफेयरअंतर्गत प्रत्येक अधिकारी-कर्मचारी, सेवानिवृत्त झालेले, मंत्रालयीन कर्मचारी यांचे ओळखपत्र बनविण्यात येणार असून ते काम अंतिम टप्प्यात आहे.