शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

सहा वर्षांत चक्क १२३ मीटर मागे सरकले ग्लेशियर; एवढा बर्फ वितळला की तयार होतील 3 सरोवरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2023 11:05 IST

भारतात लडाख येथेही हा परिणाम जाणवत आहे. या भागातील ग्लेशियर वेगाने वितळत असून पार्काचिक ग्लेशियरच्या आत तीन नव्या सराेवरांची निर्मिती हाेऊ शकते.

नवी दिल्ली : जागतिक तापमान वाढीमुळे जगभरात अनेक नैसर्गिक संकटे येत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून अनेक ठिकाणची ग्लेशियर्स वितळू लागली आहे. भारतात लडाख येथेही हा परिणाम जाणवत आहे. या भागातील ग्लेशियर वेगाने वितळत असून पार्काचिक ग्लेशियरच्या आत तीन नव्या सराेवरांची निर्मिती हाेऊ शकते. तसे झाल्यास या भागात माेठे संकट येऊ शकते, अशी भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. 

विज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारितील स्वायत्त संस्था ‘वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिऑलाॅजी’च्या शास्त्रज्ञांनी यासंदर्भात प्रदीर्घ अभ्यास केला. त्यांनी त्यासंदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला असून, लडाखमधील हिमालयाचा परिसर, पार्कचिक ग्लेशियर या ठिकाणी हाेत असलेल्या वेगवान परिवर्तनाकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. डाॅ. मनीष मेहता यांच्या नेतृत्त्वाखालील शास्त्रज्ञांच्या पथकाने १९७१ ते २०२१ या कालावधीतील उपग्रहाने काढलेल्या छायाचित्रांचा वापर केला.  

काय आढळले? -- वर्ष १९७१ ते २०२१ या कालावधीत ग्लेशियर्स वितळून मागे हटले आहेत. हा वेग १९९९ नंतर सहा पटीने वाढला आहे, तर २०१५ नंतर दहा पट अधिक वेगाने ग्लेशियर्स वितळले आहेत. - १९७१ ते १९९९ या कालावधीत २एमए-१ या गतीने ग्लेशियर्स मागे हटले. १९९९ ते २०२१ दरम्यान ही गति १२एमए-१ एवढी आढळली. २०१५ नंतर हा वेग २०.५एमए-१ एवढा हाेता.

...तर येणार माेठे संकट -२०१७ मध्येही ग्लेशियरचा माेठा भाग वितळून तुटला हाेता. हा वेग वाढल्यास लडाखमध्ये माेठे संकट निर्माण हाेऊ शकते, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.