सोनियांच्या प्रकृतीत सुधारणा
By admin | Updated: December 20, 2014 22:28 IST
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या प्रकृतीत सुधारणा आहे़ मात्र आणखी काही दिवस त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे़
सोनियांच्या प्रकृतीत सुधारणा
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या प्रकृतीत सुधारणा आहे़ मात्र आणखी काही दिवस त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे़श्वसनप्रणालीच्या खालच्या भागात जंतूसंसर्ग झाल्याने सोनियांना गुरुवारी संध्याकाळी येथील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ आज शनिवारी रुग्णालयाच्या व्यवस्थापन बोर्डाचे अध्यक्ष डॉ़ अजय स्वरूप यांनी सांगितले की, सोनिया गांधी यांची प्रकृती स्थिर आहे़ त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत आहे़ मात्र त्यांना काही काळ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येईल़