साताराजवळील घटना : चौघेजण जखमी; सर्वजण बारामती येथील रहिवासीसातारा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खोडद फाट्याजवळ दुधाच्या टँकरने पाठीमागून कारला जोरदार धडक दिली. यामध्ये कारमधील एक वृद्ध ठार झाला तर इतर चौघेजण जखमी झाले आहेत. मृत व जखमी बारामती येथील रहिवासी आहेत. प्रभाकर गालिंदे (वय ६६) असे मृताचे नाव आहे. पाल येथे देवदर्शनासाठी जाताना ही घटना घडली. सोमवारी बारामती येथील काहीजण कारने पाल येथे देवदर्शनासाठी जात होते. सातारा तालुक्यातील खोडद फाट्याजवळ दुधाच्या टँकरने कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यामध्ये कारमधील प्रभाकर गालिंदे (वय ६६) हे ठार झाले. तर राजेंद्र गालिंदे, मनीषा गालिंदे, विजय गालिंदे आणि अक्षय गालिंदे हे जखमी झाले. जखमीमधील काहीजणांवर सातारा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (प्रतिनिधी)
सुधारित: टँकरची कारला धडक; एकजण ठार
By admin | Updated: February 29, 2016 23:56 IST