शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

अधिक महसुलासाठी अधिकाऱ्यांची शक्कल!

By admin | Updated: June 23, 2016 01:33 IST

तुम्ही काय प्यावे हे जर सरकार किंवा सरकारचे अधिकारी ठरवू लागले तर? ऐकून कदाचित धक्का बसेल; पण ही वस्तुस्थिती आहे

बंगळुरू : तुम्ही काय प्यावे हे जर सरकार किंवा सरकारचे अधिकारी ठरवू लागले तर? ऐकून कदाचित धक्का बसेल; पण ही वस्तुस्थिती आहे. होय, कर्र्नाटकात जर तुम्हाला बीअर पिण्याचा मूड झाला तर ती एवढ्या सहजासहजी मिळणार नाही. कारण, उत्पादन शुल्क विभागाने अघोषित काढलेल्या फतव्यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये नाइलाजाने बीअरऐवजी महागडी दारूच घ्यावी लागते. कर्नाटकातील मोठ्या रेस्टॉरंटमध्ये जर बीअरची आॅर्डर केली, तर वेटरकडून असे उत्तर मिळेल की, आपणाला बीअर मिळणार नाही. अर्थात, त्याऐवजी भारतीय बनावटीची महागडी विदेशी दारू मात्र भरपूर मिळेल. हा फंडा आहे उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांचा. अधिक महसूल जमा करण्यासाठी ही शक्कल लढविली जात आहे. दारूवरील शुल्काच्या माध्यमातून सरकारला मोठे महसुली उत्पन्न मिळते. २०१३-१४ मध्ये यात १५ टक्क्यांहून अधिक वाढ झालेली आहे; पण २०१४- १५ मध्ये यात घट झाली. या त्यामुळे आता संबंधित विभागाकडून दारू विक्रीसाठी विक्रेत्यांवर दबाव आहे. नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशनचे बंगळुरूतील अध्यक्ष आशिष कोठारे म्हणाले की, जर ५० लिटर महागडी दारू खरेदी केली, तर फक्त १० लिटर बीअर मिळते. येथील मद्य विक्रेत्यांच्या संघटनेचे नागेश बाबू म्हणतात की, सरकारचे अधिकारी आम्हाला त्रस्त करीत आहेत. सरकारला दारूपासून मोठे उत्पन्न असल्याने त्याचे वितरण गोदामातून अतिशय वेगाने होते. एका रेस्टॉरंट मालकाने सांगितले की, तरुणांमधून बीअरला सर्वाधिक मागणी आहे; पण आम्ही ती पुरवू शकत नाही. दारूबंदीच्या मूळ उद्देशालाच उत्पादन शुल्क विभागाने हरताळ फासला आहे. दारूबंदीसाठी प्रयत्न सुरू असतानाच उत्पादन शुल्क विभाग मात्र दारू विक्रीसाठी प्रोत्साहन देत आहे. (वृत्तसंस्था)