सुधारित : राजीव महर्षी नवे केंद्रीय गृहसचिव नियुक्त
By admin | Updated: August 31, 2015 21:30 IST
सुधारित : राजीव महर्षी नवे केंद्रीय गृहसचिव नियुक्त
सुधारित : राजीव महर्षी नवे केंद्रीय गृहसचिव नियुक्त
सुधारित : राजीव महर्षी नवे केंद्रीय गृहसचिव नियुक्त गोयल यांचा कार्यकाळ अचानक समाप्त(यात गोयल यांचे म्हणणे व अन्य भाग जोडला आहे.)नवी दिल्ली : अचानक घडलेल्या एका आश्चर्यजनक घडामोडीत सोमवारी सेवानिवृत्त होणार असलेले वरिष्ठ आयएएस अधिकारी राजीव महर्षी यांची केंद्रीय गृहसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सात महिन्यांपूर्वी गृह सचिवपदाचा कार्यभार सांभाळणारे एल. सी. गोयल यांनी स्वेच्छानिवृत्ती मागितल्यामुळे त्यांचा कार्यकाळ अचानक समाप्त करीत केंद्र सरकारने त्यांच्या जागी महर्षी यांची नियुक्ती केली. गोयल यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ संपायला अद्याप १७ महिने बाकी होते.वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यामुळे महर्षी सोमवारी सेवानिवृत्त होणार होते. परंतु त्याआधीच सरकारने त्यांना गृह सचिवपदी नियुक्त करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. सोबतच गोयल यांचा स्वेच्छानिवृत्तीची विनंती करणारा अर्जही मंजूर करण्यात आला. कार्यकाळ संपण्याच्या आधीच सरकारमधून बाहेर पडलेले गोयल हे तिसरे नोकरशहा आहेत. याआधीचे गृह सचिव अनिल गोस्वामी आणि परराष्ट्र सचिव सुजाता सिंग यांना कार्यकाळ संपण्याच्या आधीच घरी पाठविण्यात आले होते.१९७८ च्या तुकडीतील राजस्थान कॅडरचे आयएएस अधिकारी महर्षी यांची तत्काळ प्रभावाने दोन वर्षांसाठी करण्यात आलेल्या या नियुक्तीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजुरी दिली आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. महर्षी हे सध्या वित्त मंत्रालयाच्या आर्थिक कामकाज विभागात सचिव म्हणून कार्यरत आहेत. पंतप्रधानांनी गोयल यांची स्वेच्छानिवृत्तीची विनंतीही मान्य केल्याची माहिती या सूत्रांनी दिली. दरम्यान सेवानिवृत्ती घेण्याचा आपला निर्णय व्यक्तिगत आहे आणि सरकारवर आपली कसलीही नाराजी नाही. व्यक्तिगत कारणांमुळे मी पदावर कायम राहू इच्छित नाही. हा माझा स्वत:चा निर्णय आहे. यामागे दुसरे कोणतेही कारण नाही, असे गोयल यांनी पत्रकारांना सांगितले. (वृत्तसंस्था)