शहरं
Join us  
Trending Stories
1
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
2
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
3
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
4
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
5
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
6
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
7
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
8
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
9
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
10
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
11
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
12
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
13
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
14
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
15
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
16
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
17
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
18
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
19
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 
20
Pitru Paksha 2025: तिथीनुसार पितरांचे श्राद्ध करा, 'हे' लाभ मिळवा आणि तिथीच माहीत नसेल; तर... 

सुधारित... पेशावर हल्ल्याचे देशभरात तीव्र पडसाद निषेध : मोदी आणि खासदारांची संसदेत मौन आदरांजली, शाळांमध्ये खास प्रार्थना

By admin | Updated: December 18, 2014 00:40 IST

नवी दिल्ली : पेशावरच्या शाळकरी मुलांवरील तालिबानींच्या भ्याड हल्ल्याचे देशभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व खासदारांनी संसदेत दोन मिनिटांचे मौन पाळत हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निरागस चिमुकल्यांना आदरांजली अर्पण केली. विविध शाळांनीही मौन पाळून किंवा विशेष प्रार्थना घेऊन आदरांजली वाहिली. दरम्यान फेसबुक, टिष्ट्वटर आणि अन्य सोशल मीडियावर तालीबानी हल्ल्याची तीव्र निंदा करणाऱ्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.

नवी दिल्ली : पेशावरच्या शाळकरी मुलांवरील तालिबानींच्या भ्याड हल्ल्याचे देशभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व खासदारांनी संसदेत दोन मिनिटांचे मौन पाळत हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निरागस चिमुकल्यांना आदरांजली अर्पण केली. विविध शाळांनीही मौन पाळून किंवा विशेष प्रार्थना घेऊन आदरांजली वाहिली. दरम्यान फेसबुक, टिष्ट्वटर आणि अन्य सोशल मीडियावर तालीबानी हल्ल्याची तीव्र निंदा करणाऱ्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.
वडोदऱ्यातील विविध शाळांमधील शिक्षक व विद्यार्थ्यांनी तालिबानी हल्ल्यात ठार झालेल्या शाळकरी मुलांना श्रद्धांजली वाहिली. अभियांत्रिकी व व्यवस्थापनशास्त्राच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी काळे बिल्ले लावून निषेध नोंदविला.
श्रीनगरमध्ये जामिया मशिदीत प्रार्थना
येथील हुरियत कॉन्फरन्सच्या मीरवाईज उमर फारूक यांच्या नेतृत्वात केलेल्या शांततापूर्ण निषेध आंदोलनात शेकडो नागरिक सहभागी झाले होते. यावेळी येथील जामिया मशिदीत ठार झालेल्या मुलांकरिता प्रार्थना करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी हाती काळे झेंडे घेऊन आपला निषेध नोंदवला. इस्लाममध्ये दहशतवादाला जागा नाही असे मीरवाईज यांनी यावेळी म्हटले. हा हल्ला एक भ्याड हल्ला असून त्याचा इस्लाम व जिहादशी काहीही संबंध नाही. या हल्ल्यात सहभागी असलेल्या लोकांनी इस्लाम या धर्माची बदनामी केली आहे असे ते म्हणाले.
......................
पाटण्यातील शाळांमध्ये
सुरक्षा वाढविली
दरम्यान पाटण्यातील शाळांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली असून पोलिसांनी शिक्षण संस्थांना शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यास सांगितले आहे. पोलीस अधीक्षक जितेंद्र राणा यांनी, शाळा व अन्य शिक्षण संस्थांजवळ पोलीस दलाला तैनात केल्याचे सांगितले. तसेच शाळांजवळ असलेल्या पोलीस ठाण्यांत शाळांमधून मुलांना घरी नेण्यासाठी नियुक्त केलेल्या सर्व प्रकारच्या वाहनांचे चालक व वाहकांची माहिती नोंदविण्यास सांगितली आहे. येथील अनेक शाळांमध्ये बुधवारी पाकिस्तानात तालिबान्यांनी केलेल्या हल्ल्यात ठार झालेल्या निरपराध मुलांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
-------------------
प्रतिक्रिया
हा हल्ला मानवतेविरुद्धचा सर्वात मोठा गुन्हा आहे. कोणताही धर्म अशा प्रकारच्या कृत्याची परवानगी देत नाही. अशा घटना जगात कुठेच घडू नयेत. मुले ही देवदूतासारखी असतात. त्यांचे कुणाशीच वैर नसते. या मुलांच्या पालकांना जे दु:ख झाले असेल ते मी समजू शकतो.
शिवराजसिंग चौहान, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री.

ज्यांनी या निष्पाप मुलांना ठार केले त्यांना अल्ला कधीच माफ करणार नाही. ही माणसे स्वत:ला मुसलमान कसे म्हणवतात? त्यांची अल्लाचे नाव घेण्याची हिंमत कशी होते? पाकिस्तानात जे घडले त्याविषयी दु:ख व्यक्त करण्यास शब्द अपुरे आहेत.
केंद्रीय मंत्री नजमा हेपतुल्ला
केरळ विधानसभेने केला निषेध
केरळ विधानसभेने पाकिस्तानातील शाळकरी मुलांवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. उपसभापती एन.सकथान यांनी या घटनेबद्दल प्रतिक्रिया नोंदविली व सदस्यांनी मौन राखून या मुलांना श्रद्धांजली वाहिली.
तालिबान्यांच्या विकृत व अमानुष मनाचे दर्शन घडविणारी घटना अशा शब्दात सीपीआयने (एम) आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पक्षाने जारी केलेल्या निवेदनात, दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी भारत व पाकने परस्परांना सहकार्य केले पाहिजे असे म्हटले आहे.