सुधारित-ईशान्य प्रदेशात
By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST
ईशान्य प्रदेशात वाघांच्या संख्येत वाढ कु ल शब्द(146)
सुधारित-ईशान्य प्रदेशात
ईशान्य प्रदेशात वाघांच्या संख्येत वाढ कु ल शब्द(146)ईशान्य प्रदेशात वाघांच्या संख्येत वाढगुवाहाटी-ईशान्येकडील डोंगराळ प्रदेशात व ब्रह्मपुत्रेच्या पूरग्रस्त पठारी भागात २०१० मधील १४८ वाघांच्या संख्येत वाढ होऊन ती २०१४ मध्ये २०१ एवढी झाली आहे. वाघांच्या बाबतीत अलीकडेच आलेल्या नव्या अहवालानुसार, आसामात वाघांच्या संख्येत सर्वात जास्त वाढ झाली आहे. तेथे २०१० मधील १४३ ही संख्या २०१४ मध्ये १६७ वर गेली आहे. अरुणाचल प्रदेशात २००६ मध्ये १४ वाघ होते ते आता २८ झाले आहेत. आसाम व अरुणाचल प्रदेशाव्यतिरिक्त मिझोरम व उत्तर बंगालच्या क्षेत्रांचाही समावेश या अहवालात केला आहे. या प्रदेशात सात व्याघ्र प्रकल्प असून तीत आसामात मानस, काजीरंगा व नामेरी, अरुणाचलमध्ये पाक्के व नामदफा, मिझोराममध्ये दामपा व प. बंगालमध्ये बुक्सा हे आहेत. आसामच्या काजीरंगा राष्ट्रीय उद्यानात वाघांची संख्या सर्वात जास्त म्हणजे १५७ एवढी आहे. तर अरुणाचल प्रदेशच्या नामदफा उद्यानात सर्वात कमी म्हणजे ४ वाघ आहेत.या भागात वाघांची संख्या वाढण्याची व असलेली संख्या टिकण्याची शक्यता असली तरी येथे होणारी अवैध शिकार व अन्य कारणांमुळे वाघांची संख्या कमी प्रमाणात वाढली आहे. (वृत्तसंस्था)