शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सुधारित-राज्यातील अर्धे स्वाईन फ्लूचे रुग्ण नागपुरात

By admin | Updated: February 10, 2015 00:56 IST

सुधारित-राज्यातील अर्धे स्वाईन फ्लूचे रुग्ण नागपुरात

सुधारित-राज्यातील अर्धे स्वाईन फ्लूचे रुग्ण नागपुरात
-पालकमंत्र्यांनी घेतली स्वाईन फ्लूवर बैठक : उपाययोजनेसाठी नोडल अधिकाऱ्याची नेमणूक
नागपूर : स्वाईन फ्लूने राज्यात आतापर्यंत ३८ रुग्णांचा मृत्यू झाला असून १९३ पॉझिटिव्ह आले आहेत. यातील ५८ टक्के रुग्ण एकट्या नागपुरातील आहेत. स्वाईन फ्लूवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे नोडल अधिकाऱ्याची जबाबदारी देण्यात आली आहे. सोबतच मेडिकलच्या स्वाईन फ्लू वॉर्डाच्या खाटा ३० वरून वाढवून ४५ करण्याचा व जनजागृतीसाठी पाच लाख पत्रके वितरित करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.
स्वाईन फ्लू नियंत्रणात आणण्यासाठी सोमवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीला विभागीय आयुक्त अनुप कुमार, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ. सतीश पवार, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, आमदार डॉ. मिलिंद माने, महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, नागपूर विभागात स्वाईन फ्लूचे १९ बळी गेले असून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८५ झाली आहे. स्वाईन फ्लू रुग्णाची निश्चित आकडेवारी मिळण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे नोडल अधिकाऱ्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यामुळे रोज मेडिकल, मेयोसह, महानगरपालिका, आरोग्य विभागाची इस्पितळे व खासगी इस्पितळे नोडल अधिकाऱ्याला सायंकाळी ५ वाजतापूर्वी रिपोर्टिंग करतील. नोडल अधिकारी हा रोजचा अहवाल एकत्र करून तो पालकमंत्री ते विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त व महापौरांना सादर करेल.
-जनजागृतीसाठी पाच लाख पत्रकांचे वितरण
पालकमंत्री म्हणाले, थंडी लांबल्याने व जनजागृतीअभावी स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णासोबतच त्याच्या नातेवाईकांनी आणि सामान्य नागरिकांनी घ्यावयाची काळजी व उपाययोजनांची माहिती देणारी पाच लाख पत्रके लवकरच वितरित करण्यात येणार आहे. संशयित रुग्णाच्या मदतीसाठी काही फोननंबरही यात देण्यात आले आहेत.