शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
5
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
6
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
7
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
8
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
9
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
10
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
11
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
12
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
13
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
14
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
15
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
16
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
17
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
18
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
19
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
20
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"

सुधारित: सेवागिरी रथोत्सवात भरला भक्तीचा मेळा

By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST

पुसेगाव यात्रा : माजी मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत निघाली शाही मिरवणूक

पुसेगाव यात्रा : माजी मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत निघाली शाही मिरवणूक

पुसेगाव : सद्गुरु श्री सेवागिरी महाराजांच्या जयघोषात बेलफुल गुलालाची उधळण करत भक्तिमय व उत्साही वातावरणात श्री सेवागिरी महाराजांचा रथोत्सव आज, शनिवारी उत्साहात झाला. यावेळी महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटक, गुजरात व इतर राज्यांमधील सुमारे ८ लाख भाविकांनी पुसेगाव सुवर्णनगरीत हजेरी लावली.
मंगळवारी पहाटे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, देवस्थान ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त मोहनराव जाधव-पाटील, डॉ. प्र. ल. भुजबळ, शिवाजीराव जाधव, विजय द. जाधव, ॲड. विजयराव जाधव व ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीस अभिषेक, मंत्रपुष्पांजली अर्पण करून आरती करण्यात आली. त्यानंतर पहाटे फुलांनी सजवलेल्या मानाच्या रथामध्ये श्री सेवागिरी महाराजांची प्रतिमा व पादुकांची प्रतिष्ठापना करण्यात आली.
माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, माजी वनमंत्री पतंगराव कदम यांच्या हस्ते सकाळी दहाला मानाच्या रथाचे पूजन करून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी आमदार शशिकांत शिंदे, आमदार जयकुमार गोरे, आमदार आनंदराव पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, उपाध्यक्ष रवी साळुंखे, बाळासाहेब सोळस्कर उपस्थित होते.
यावेळी टाळ-मृदगांच्या गजरात ढोल-ताशे व बँडपथकाच्या निनादात निघालेल्या मिरवणुकीच्या अग्रभागी गजराज आणि अश्व भाविकांचे लक्ष वेधून घेत होते. दर्शनाला येणारे भाविक नारळ, बेलफुल, पुष्पहार, पेढे व नोटांच्या माळा रथावर अर्पण करीत होते.
भाविकांनी श्री सेवागिरी मंदिरात संजीवन समाधीच्या दर्शनासाठी पहाटेपासून रांगा लावल्या होत्या. मंदिर ते यात्रास्थळ (मुख्य रस्ता), पोस्ट कार्यालय मार्गे मंदिर अशी बारा ते चौदा तास रथ मिरवणूक झाली. रथयात्रा संपल्यानंतर रथावरील देणगी रक्कम पोलीस बंदोबस्तात एकत्र करून नारायणगिरी महाराज भक्त निवासात नेण्यात आली. (वार्ताहर)

चौकट :
फ्लेक्समुक्त यात्रा
जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केलेल्या आवाहनाला पुसेगाव ग्रामस्थांनी प्रतिसाद देऊन यावर्षी प्रथमच फ्लेक्समुक्त सेवागिरी यात्रा साजरी केली. देवस्थान ट्रस्टव्यतिरिक्त कोणाचेच फलक नसल्याने यात्रेकरूंमधून कौतुक झाले.
रथाभोवती तसेच दर्शनरांगेवर व गर्दीच्या नियंत्रणासाठी पोलीस प्रशासनाने सीसीटी कॅमेरे व स्थानिक गुन्हे शाखेची मदत घेतली.

फोटो:
२० सातारा०१
सेवागिरी रथोत्सव : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सेवागिरी महाराजांचा रथोत्सव शनिवारी पुसेगाव (ता. खटाव) येथे उत्साहात झाला. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री पतंगराव कदम, मठाधिपती सुंदरगिरी महाराज, आमदार जयकुमार गोरे, ॲड. विजय कणसे आदी उपस्थित होते. (छाया : केशव जाधव)