शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

(महत्त्वाचे) बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त

By admin | Updated: July 11, 2015 00:15 IST

चौघे ताब्यात : मिरजेत ३४ लाखांच्या नकली नोटा जप्तसांगली : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी मिरजेत सुमारे ३४ लाखांच्या नकली नोटा जप्त केल्या तसेच दत्तवाड (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) येथील नोटा छपाईचा कारखाना छापा टाकून उद्ध्वस्त केला. घटनास्थळावरून स्कॅनर, प्रिंटर, रंगीत झेरॉक्स मशीन, कागदी बंडल जप्त केले.पोलिसांनी नोटांची ...


चौघे ताब्यात : मिरजेत ३४ लाखांच्या नकली नोटा जप्त

सांगली : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी मिरजेत सुमारे ३४ लाखांच्या नकली नोटा जप्त केल्या तसेच दत्तवाड (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) येथील नोटा छपाईचा कारखाना छापा टाकून उद्ध्वस्त केला. घटनास्थळावरून स्कॅनर, प्रिंटर, रंगीत झेरॉक्स मशीन, कागदी बंडल जप्त केले.
पोलिसांनी नोटांची छपाई करणार्‍या दत्तवाडमधील बाप-लेकासह चौघांच्या टोळीस ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. रमेश कृष्णा घोरपडे, ऐनुद्दीन गुलाब ढालाईत, इम्रान ऐनुद्दीन ढालाईत व सुभाष शिवलिंग पाटील-सोळकुडे (सर्व रा. दत्तवाड) यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.
ऐनुद्दीन ढालाईत शुक्रवारी सायंकाळी मिरजेतील स्टेशन रस्त्यावरील हैदराबाद बँकेसमोर एकाला बनावट नोटा देणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांच्या पथकाने बँकेजवळ सापळा लावला. ढालाईत तेथे आला. त्याच्या हातात बॅग होती. त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलीस सरसावताच त्याने बॅग टाकून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला पकडले. बॅगेची झडती घेतल्यानंतर त्यात सुमारे ३४ लाखांच्या बनावट नोटा आढळून आल्या. या सर्व एक हजाराच्या नोटा आहेत. ढालाईतची चौकशी केल्यानंतर त्याने दत्तवाडमख्ये रमेश घोरपडे यांच्या घरात नोटा छपाईचा कारखाना असल्याचे सांगितले.
पथकाने तातडीने ढालाईत यास सोबत घेऊन दत्तवाड गाठले. रमेश घोरपडे याच्या कौलारू घरावर छापा टाकण्यात आला. त्यावेळी रमेश घोरपडे, इम्रान ढालाईत, सुभाष पाटील हे नोटांची छपाई करताना रंगेहाथ सापडले. (प्रतिनिधी)
---------------
फोटो : १०सांगली०१, १०सांगली०२
सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने शुक्रवारी रात्री दत्तवाड (ता. शिरोळ) येथे छापा टाकून नोटा कापण्याचे यंत्र (कटिंग मशीन) जप्त केले. दुसर्‍या छायाचित्रात पथकाने जप्त केलेले स्कॅनर व प्रिंटर.
(छाया : नंदकिशोर वाघमारे)