महत्वाच्या सिंगल
By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST
प्रयोगशाळेत चोरी
महत्वाच्या सिंगल
प्रयोगशाळेत चोरी नागपूर : कंेद्रीय लोक निर्माण विभागाच्या प्रयोगशाळेतून चोरट्यांनी टेस्टिंग मशीन, लोखंडी हॅण्डल,बेईंग लोखंडी प्लेट, डेझर कूलरच्या पाण्याची मोटार, पंख्याचे पाते, टाईल्स मशीन, इलेक्ट्रिकल टाईल्सटेस्टिंग मशीन, बॅलेन्स मशीन, क्यूब गोल्ड, वॉल फॅन व इतर असे ६३ हजारांचे साहित्य चोरून नेले, आज ही घटना उघडकीस आली. राहुल घनश्याम नांदगावकर यांच्या तक्रारीवरून बुधवारी गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला.---विद्यार्थिनीची पर्स लंपासनागपूर : आकांक्षा अनुपकुमार गुप्ता (वय १९, रा. अयोध्यानगर) या विद्यार्थिनीची १० हजारांची रोकड असलेली पर्स दोन लुटारूंनी हिसकावून नेली. बुधवारी सायंकाळी ६ वाजता कुलबास्वामी हॉटेलजवळ ही घटना घडली. सक्करदरा पोलिसांनी जबरीचोरीचा गुन्हा दाखल केला.---करंट लागल्याने मृत्यूनागपूर : करंट लागल्यामुळे लव राजेंद्र सहानी (वय २४) या तरुणाचा बुधवारी रात्री करुण अंत झाला. तो कळमन्यातील बजरंग चौक, विजयनगरात राहात होता. कळमना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.------