शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

महत्वाची- सिकलसेल-थॅलेसिमियाच्या रुग्णांना आवश्यक सुविधा मिळाव्यात

By admin | Updated: July 3, 2015 23:00 IST

सिकलसेल-थॅलेसिमियाच्या रुग्णांना आवश्यक सुविधा मिळाव्यात

सिकलसेल-थॅलेसिमियाच्या रुग्णांना आवश्यक सुविधा मिळाव्यात
विकी रुघवानी यांची मागणी : अभ्यागत मंडळाच्या बैठकीत व्हावा निर्णय
नागपूर :
थॅलेसिमिया व सिकलसेल रुग्णांना शासकीय रुग्णालयात आवश्यक औषधोपचार व सुविधा उपलब्ध व्हाव्यात, अशी मागणी थॅलेसिमिया सोसायटी ऑफ सेंट्रल इंडियाचे अध्यक्ष डॉ. विकी रुघवानी यांनी केली आहे.
शनिवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यागत मंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे सुद्धा सहभागी होणार आहेत. याशिवाय सर्व वरिष्ठ वैद्यकीय अधिकारीसुद्धा उपस्थित राहतील. तेव्हा या बैठकीत सिकलसेल व थॅलेसिमियाच्या रुग्णांवरही सखोल चर्चा होऊन, निर्णय व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
थॅलेसिमियाच्या रुग्णांना नियमित औषधांचा पुरवठा होणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून या रुग्णांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नियमितपणे गोळ्या उपलब्ध राहाव्यात. तसेच मेडिकलमध्ये सीव्हीएसची सुविधा उपलब्ध केल्यास रुग्णांवर होणारा अतिरिक्त खर्चाचा भार वाढणार नाही. याशिवाय थॅलेसिमिया आजार असलेल्या रुग्णांना वारंवार देण्यात येणाऱ्या रक्त संचयनामुळे एचआयव्ही व हेपेटायटेस बी सारख्या रोगांचे संक्रमण होण्याची भीती असते. सुरक्षित रक्त संचयनासाठी मेडिकलच्या रक्तपेढीमध्ये नेट टेस्टींगची सुविधा उपलब्ध करण्यात यावी, अशी मागणी सुद्धा डॉ. विकी रुघवानी यांनी केली आहे.