महत्त्वाचे - पान १ - फी माफी
By admin | Updated: September 8, 2015 02:08 IST
दुष्काळी भागातील
महत्त्वाचे - पान १ - फी माफी
दुष्काळी भागातीलविद्यार्थ्यांची फी माफ - शेतकर्यांना दिलासा : बारावीपर्यंतच्या मुलांना विशेष सवलत मुंबई : दुष्काळी भागातील शेतकर्यांच्या मुलांची बारावीपर्यंतची फी माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी दिली. त्याचप्रमाणे दुष्काळाचा फटका बसलेल्या जिल्ह्यांमधील शेतकर्यांच्या अभियांत्रिकी व वैद्यकीय शाखेच्या मुलांना फीमध्ये ५० टक्के सवलत मिळणार आहे. राज्यातील ६९ तालुके दुष्काळाने होरपळले आहेत. त्यात पावसाने पाठ फिरविलेल्या मराठवाड्यातील सर्वाधिक तालुक्यांचा समावेश आहे.राज्य सरकारने १.३५ कोटी शेतकर्यांना अपघात विमा योजनेचा लाभ देण्याचेही ठरविले आहे. विम्याचा हप्ता सरकार भरणार आहे. विमाधारक शेतकर्याचा मृत्यू झाल्यास या योजनेअंतर्गत त्याच्या कुटुंबाला २ लाख रुपयांची भरपाई मिळेल. मात्र आत्महत्या केलेल्या शेतकर्याच्या कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळणार नाही, असे खडसे यांनी स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)