महत्त्वाचे वृत्त - अंकात फोल्डच्या वर ठळकपणे घ्यावे
By admin | Updated: May 21, 2014 00:47 IST
मोदींच्या मनीचे गुपित कुणाला कळेना
महत्त्वाचे वृत्त - अंकात फोल्डच्या वर ठळकपणे घ्यावे
मोदींच्या मनीचे गुपित कुणाला कळेनामंत्रिमंडळ रचनेचे गूढ कायम : प्रथमच 11 दिवसांनी येणार सरकारहरीश गुप्तानवी दिल्ली : दिल्लीतील सत्तेच्या भौगोलिक परिघात वावर नसलेली म्हणजेच दिल्लीबाहेरची व्यक्ती 26 मे ला संध्याकाळी पंतप्रधानपदाची शपथ घेईल तोवर, हे सरकार कशाप्रकारचे असेल, हे दिल्लीकरांसाठी सुद्धा गुलदस्त्यातच राहणार आहे.भाजपाला 16 मे रोजी ऐतिहासिक जनादेश मिळाला. निकालानंतर 11 दिवसांनी एखाद्या पक्षाच्या सरकारचा शपथविधी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. राजकीय पंडित, शत्रू, मित्र आणि मंत्रिपदासाठी इच्छुक सर्वच जण तर्कवितर्कात गुंतले आहेत. कुणालाही कोणता सुगावा लागलेला नाही. मंत्रिमंडळात कोण असेल, कुणाला बाहेर ठेवले जाईल. ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्या नाराज ब्रिगेडची कोणती भूमिका असेल? प्रधान सचिव, मंत्रिमंडळ सचिव किंवा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण असणार, राजनाथ सिंह सरकारमध्ये जाणार असतील तर पक्षाध्यक्ष कोण होणार? अरुण जेटली अर्थमंत्री नाही झाले तर, अन्य कोण होणार, अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे कळायला पाच दिवस लागणार असून कुणाकडेही ठोस उत्तर नाही. मोदींचे खास विश्वासू आणि रणनीतीतज्ज्ञ अमित शाह सर्वांना भेटतात, पण त्यांनाही काही माहीत नाही. त्यांच्याकडे खास विश्वासू असे पत्रकारही नाहीत. सरकारसंबंधी इत्यंभूत माहिती बाहेर येणे हे यापूर्वीच्या सरकारांच्या बाबतीत स्वाभाविक असायचे.पण यावेळी नेमके काय शिजत आहे, याचा सुगावा लावणे, हे खरे तर जिकिरीचे काम झाले आहे. मोदी मंगळवारी दुपारपर्यंत गुजरात भवनात तळ ठोकून होते. त्यांनी 15 व्या लोकसभेतील उपाध्यक्ष कारिया मुंडा यांना फोन करून दिल्लीला येता का, म्हणून विचारले. 20 मे रोजी भाजपाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीला हजर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले, तेव्हा मोदींनी मी तुम्हाला भेटायला येऊ का म्हणून प्रश्न विचारला. त्यावर मुंडा भारावून गेले. त्यांनी मीच गुजरात भवनला येतो असे उत्तर दिले. रात्री 10.30 वाजता या दोघांची भेट झाली. पाऊण तास चर्चा केली. कोणते मुद्दे होते कळले नाही. मुंडा यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल किंवा ते नवे लोकसभा अध्यक्ष असतील असे मानले जाते. याचा अर्थ लालकृष्ण आडवाणी बाहेर राहतील. मोदींनी आडवाणींची भेट घेऊन पाऊण तास चर्चा केली, त्यावेळी आडवाणींच्या कन्या प्रतिभा याही सहभागी झाल्या होत्या. माझे वडील लोकसभेचे अध्यक्ष झाल्यास आनंदच होईल, असे त्या एका निवेदनात म्हणाल्या.मोदींनी आडवाणींसोबत राजकारणावर केवळ पाच मिनिटेच चर्चा केली. पुढील 40 मिनिटे त्यांनी प्रतिभा यांच्यासोबत चित्रपटनिर्मितीवर चर्चा केली. सुषमा स्वराज यांनी भेटीची वेळ मागितली असता मोदींनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले, पण त्यांनाही थांगपत्ता लागू दिला नाही. अमित शाह, जे.पी. नड्डा, धर्मेंद्र प्रधान आणि अरुण जेटली यांच्याशिवाय अन्य कुणी मोदींचे कान नाहीत. मंत्रिमंडळ रचनेचा मुद्दा येतो तेव्हा ते या सर्वांची मते ऐकून घेतात. भेट घेणार्या सर्वांनाच ते राजनाथ सिंह यांच्याकडे पाठवत आहेत. भेट घेणारे लोक सरकार आणि पक्षासाठी कसे महत्त्वपूर्ण ठरतील, तसेच त्यांनी भूतकाळात काय केले याबाबत माहिती देण्याचे त्यांनी राजनाथ सिंह यांना सांगितले आहे. पण राजनाथ यांनाच आपले खाते माहीत नाही. अरुण शौरी यांचे नाव अर्थमंत्री म्हणून समोर आले होते. शौरी यांनी राजनाथ यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी मी यादी मोदींकडे पाठवणार असून तेच निर्णय घेतील असे मोकळेपणाने सांगितले.त्यानंतर शौरींनी मोदींची भेट घेतली. मंगळवार संध्याकाळी मंत्रिमंडळाबाबत चित्र स्पष्ट झाले नव्हते. रालोआचे मित्र नसलेल्यांचेही स्वागत करू, असे मोदींनी जाहीरपणे म्हटले होते. तथापि, रालोआतील घटक पक्षांनाही मंत्रिमंडळात समावेश होईल की नाही, याची खात्री नाही. पदाच्या मागे न लागता काम करीत राहा, असे मोदींनी भाजपाच्या खासदारांना निक्षून सांगितले आहे.--------------------‘जमाना तो युवाओंका आ गया’रामविलास पासवान यांनी पत्नी आणि पुत्र चिराग यांच्यासोबत भेट घेतली. पासवान यांनी याआधी किती खात्यांचा पदभार सांभाळला, हे सांगायला सुरुवात केली. त्यावेळी मोदी म्हणाले, पासवानजी मला माहीत आहे. तुम्ही सांगण्याची गरज नाही. तुम्ही ज्येष्ठ व्यक्ती आहात. ‘जमाना तो युवाओंका आ गया’ हे वाक्य उच्चारल्यानंतर त्यांनी चिराग यांच्याकडे बघत चिराग अजून वाट बघू शकतात, अशी पुस्तीही जोडली; मात्र त्यावरून काही अंदाज बांधणे शक्य झाले नाही. ----------------------------राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपद वगळणार..राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपद वगळले जाणार असून राष्ट्रीय गुप्तचर विभागाचे महासंचालक हे नवे पद निर्माण केले जाईल. त्यांनी ज्येष्ठ सुरक्षा तज्ज्ञ अजित डोवाल यांच्याकडून देशाच्या अंतर्गत सुरक्षा तसेच शेजारी देशांच्या सुरक्षेबाबत विस्तृत माहिती घेतली आहे. रालोआच्या काळात डोवाल हे आयबीचे प्रमुख राहिले आहे. याचा अर्थ त्यांच्याकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली जाईल असे मानले जाते. विशेष म्हणजे, गृहसचिव अनिल गोस्वामी यांनी स्वत:हून मोदींना भेटीची वेळ मागितली आहे. (क्रमश:)