महत्त्वाच्या बातम्या... जोड
By admin | Updated: September 10, 2015 16:46 IST
डासप्रतिबंधक औषधांची धूरळणी करा
महत्त्वाच्या बातम्या... जोड
डासप्रतिबंधक औषधांची धूरळणी कराखापरखेडा : परिसरात डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यातच नागरिक टाक्यात पाणी साठवून ठेवत असल्याने त्या पाण्यात डेंग्यूच्या डासांच्या अळ्या आढळण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरातील गावांमध्ये डास प्रतिबंधक औषधांची धूरळणी करून डबक्यात गप्पी मासे टाकण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.***जवाहर विहिरींना मंजुरी मिळणार क धी?कळमेश्वर : तालुक्यातील अनेक लाभार्थी शेतकऱ्यांनी जवाहर विहिरींसाठी अर्ज सादर केले आहे. त्या विहिरींना अद्यापही मंजुरी देण्यात आली नाही. शेतकरी पंचायत समिती कार्यालयाचे हेलपाटे मारत आहेत. पालकमंत्र्यांनी या विहिरींना मंजुरी देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. ***रिक्त पदांमुळे ग्रामीण रुग्णांची हेळसांडकोराडी : कामठी तालुक्यातील आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांची महत्त्वाची पदे रिक्त आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांची हेळसांड होत असून, त्यांना उपचारासाठी पदरमोड करून खासगी डॉक्टरांकडे जावे लागत आहे. त्यामुळे ही रिक्त पदे त्वरित भरण्याची मागणी सरपंच संघटनेने केली आहे. ***