शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महत्त्वाच्या बातम्या... जोड...०१

By admin | Updated: October 3, 2015 00:20 IST

प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
खापरखेडा : कोळशाची भुकटी व फ्लाय ॲशची वाहतूक तसेच वीज केंद्रामुळे परिसरात हल्ली वायू प्रदूषणात वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांना श्वासाचे आजार जडायला सुरुवात झाली आहे. या वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.
***
प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढला
कळमेश्वर : शहरात व ग्रामीण भागात प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर प्रचंड वाढला आहे. त्या पिशव्यांमुळे जमीन खराब होत असून, त्या खाल्ल्याने जनावरांचे आरोग्य धोक्यात येत आहे. त्यामुळे या पिशव्यांच्या विक्री तथा वापरावर बंदी घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
***
कृषिपंपाचे बिल रीडिंगप्रमाणे द्या!
नरखेड : शेतकऱ्यांना कृषिपंपाच्या विजेचे बिल सरासरी अथवा अश्वशक्तीप्रमाणे दिले जाते. वास्तवात शेतकरी वापरत असलेल्या विजेपेक्षा बिलाची रक्कम अधिक असल्याने बिले थकीत राहतात. त्यातच वीजपुरवठा खंडित केला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना रीडिंगप्रमाणे बिले द्यावे, अशी मागणी मदन कामडे यांनी केली आहे.
**
अवैध उत्खननाला आळा घाला
उमरेड : तालुक्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात मुरमाचे खोदकाम केले जात आहे. कमी रॉयल्टी भरून अधिक खोदकाम केले जात असल्याने शासनाचा महसूल बुडत असून, पर्यावरणाला हानी पोहोचत आहे. त्यामुळे या उत्खननाला आळा घालण्याची मागणी पर्यावरण अभ्यासकांनी केली आहे.
***
कृषी विभागाने जनजागृती करावी
रामटेक : कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना विविध शेतीपयोगी साहित्य अनुदानावर दिले जाते. याची जाहिरात केली जात नसल्याने शेतकऱ्यांना माहिती होत नाही. त्यामुळे सदर साहित्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
***
कमी दाबाच्या विजेमुळे नुुकसान
सावनेर : तालुक्यातील इंदापूर शिवारातील ट्रान्सफार्मरवर ४० पेक्षा अधिक मोटरपंप आहेत. या ट्रान्सफार्मरमधून क्षमतेपेक्षा अधिक विजेचा वापर होत असल्याने कमी दाबाच्या विजेचा पुरवठा होतो. त्यामुळे मोटरपंप जळण्याचे प्रमाण वाढले आहे. यावर उपाय म्हणून या शिवारात नवीन ट्रान्सफार्मर लावण्याची मागणी जोर धरत आहे.
***