शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

महत्त्वाचे वृत्त -

By admin | Updated: August 28, 2015 00:30 IST

लंडनमधील घरावर शिक्कामोर्तब!

लंडनमधील घरावर शिक्कामोर्तब!
राज्य शासनाचा करार : डॉ. बाबासाहेबांच्या निवासस्थानाबाबत व्यवहार पुढील आठवड्यात
मुंबई/ लंडन : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याने पुनित झालेला लंडनस्थित तीन मजली बंगल्याच्या खरेदी व्यवहारावर महाराष्ट्र सरकारने शिक्कामोर्तब केले. या ऐतिहासिक वास्तूचे रुपांतर आंतरराष्ट्रीय स्मारकात केले जाणार आहे. ही वास्तू खरेदीची प्रक्रिया पुढील आठवड्यात पूर्ण केली जाणार आहे.
महाराष्ट्राचे सामाजिक न्याय आणि विशेष साह्यमंत्री राजकुमार बडोले यांनी या वास्तूच्या खरेदी व्यवहारांशी संबंधित कराराचे (डीड ऑफ एक्स्चेंज) मालकासोबत अदान-प्रदान केले, असे ब्रिटनमधील फेडरेशन ऑफ आंबेडकराईट ॲण्ड बुद्धिस्ट ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष संतोष दास (लंडन) यांनी सांगितले. या वास्तूचे शैक्षणिक आणि सांस्कृतिक केंद्रात रुपांतर केले जाईल, असेही दास यांनी सांगितले.
सन १९२१ ते १९२२ दरम्यान डॉ. आंबेडकर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे शिक्षण (डीएससी) घेत असताना लंडनस्थित १०, किंग हेन्री रोड, एनडब्ल्यू-३ स्थित याच वास्तूत राहत होते. ही वास्तू खरेदी करण्यासंबंधीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकार दोन दिवसांत रक्कम अदा करील. त्यानंतर ही वास्तू राज्याच्या मालकीची होईल, अशी माहिती सामाजिक न्याय आणि विधि राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी मुंबईत दिली.
ही वास्तू खरेदी करण्यासाठी मालकाला अगोदरच ३ कोटी १० लाख रुपये देण्यात आले आहेत. जानेवारीत राज्य सरकारने लंडनस्थित २,०५० चौरस फुट जागेतील हा ऐतिहासिक बंगला ३१ कोटी रुपयांत खरेदी करण्याचा आणि स्मारकात रुपांतर करून ही वास्तू जतन करण्याचा निर्णय घेतला होता.
------------------
महाराष्ट्र सरकारने ही वास्तू खरेदी करण्यासंबंधीच्या दस्तावेजांचे अदान-प्रदान केले आहे. १० टक्के रक्कम मालकाला देण्यात आली आहे. एकदा रजिस्ट्री झाल्यानंतर उर्वरित रक्कमही चुकती केली जाईल. राजकुमार बडोले या ऐतिहासिक क्षणी उपस्थित असतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टिष्ट्वट केले आहे.