शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
5
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
6
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
7
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
8
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
9
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
10
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
11
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
12
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
13
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
14
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
16
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
17
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
18
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
19
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
20
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा

(महत्त्वाचे) बहिणीच्या हत्येप्रकरणी इंद्राणी मुखर्जी गजाआड

By admin | Updated: August 26, 2015 00:19 IST

संपत्तीचा वाद : चालकाच्या जबाबावरून हत्याकांडाची उकलमुंबई : इंग्रजी वृत्तवाहिनीत मोठ्या पदावर कार्यरत राहिलेल्या इंद्राणी मुखर्जीला खार पोलिसांनी मंगळवारी बहिणीच्या हत्येप्रकरणी अटक केली. या कारवाईने रात्री उशिरा मुंबईत मोठी खळबळ उडवून दिली. तीन वर्षांपूर्वी अत्यंत रहस्यमय पद्धतीने झालेल्या या हत्याकांडात इंद्राणी आणि तिचा ड्रायव्हर श्याम रॉय यांचा सहभाग असल्याचे भक्कम ...


संपत्तीचा वाद : चालकाच्या जबाबावरून हत्याकांडाची उकल

मुंबई : इंग्रजी वृत्तवाहिनीत मोठ्या पदावर कार्यरत राहिलेल्या इंद्राणी मुखर्जीला खार पोलिसांनी मंगळवारी बहिणीच्या हत्येप्रकरणी अटक केली. या कारवाईने रात्री उशिरा मुंबईत मोठी खळबळ उडवून दिली.
तीन वर्षांपूर्वी अत्यंत रहस्यमय पद्धतीने झालेल्या या हत्याकांडात इंद्राणी आणि तिचा ड्रायव्हर श्याम रॉय यांचा सहभाग असल्याचे भक्कम पुरावे हाती येताच खार पोलिसांनी ही कारवाई केली. हत्या झालेल्या इंद्राणीच्या बहिणीचे शीना बोहरा नाव होते. संपत्ती व आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून इंद्राणीने तिचा काटा काढल्याची प्राथमिक माहिती खार पोलिसांना मिळाली आहे.
इंद्राणी व रॉय यांना कोणताही गाजावाजा न करता खार पोलिसांनी दुपारी वांद्रे न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत धाडले. इंद्राणी ही इंग्रजी वृत्तवाहिनीत मोठे नाव असलेल्या पीटर मुखर्जी यांची दुसरी पत्नी आहे. २००२ मध्ये त्यांचा विवाह झाला होता. पीटर हे स्टार टीव्हीचे सीईओ होते. तेव्हा इंद्राणी तेथील एचआर विभागात मोठ्या हुद्द्यावर कार्यरत होती. २००९ मध्ये मुखर्जी दाम्पत्याने आयएनएक्स वाहिनी सुरू केली होती. या हाय प्रोफाइल महिलेवरील कारवाईमुळे प्रसार माध्यमांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
२०१२ मध्ये शीनाचे अपहरण करून तिचा अत्यंत निर्घृणपणे खून करण्यात आला होता. हल्लेखोरांनी तिला मारल्यानंतर रायगडमधील घनदाट व निर्जन झाडीत तिचा मृतदेह पुरला होता. शीना बेपत्ता झाल्याबाबत कसलीही तक्रार नोंदविण्यात आलेली नव्हती. सुरुवातीला मृतदेह मिळाल्यानंतर अनोळखी महिलेच्या खुनाचा गुन्हा रायगड पोलिसांनी दाखल करून घेतला. शीनाच्या निकटवर्तीयांकडून हे कृत्य झाल्याचा पोलिसांना संशय होता़ त्यादृष्टीने तपास करण्यात येत होता.
खार पोलिसांना एका खबर्‍याने इंद्राणीचा ड्रायव्हर श्याम याचा एका मोठ्या गुन्ह्यात सहभाग असल्याची माहिती दिली. त्यानंतर गेले काही दिवस खार पोलिसांचे विशेष पथक श्यामवर नजर ठेवून होते. दोन दिवसांपूर्वी त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने इंद्राणीसाठी शीनाची हत्या केल्याची, संपूर्ण हत्याकांडात सहभागी असल्याची कबुली दिली. त्यानंतर या हत्याकांडात इंद्राणीचा सहभाग स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी तिला चौकशीसाठी बोलावले. सुमारे तीन तासांच्या चौकशीनंतर पोलिसांनी तिला अटक केली व लगोलग न्यायालयातही हजर केले. रायगड पोलिसांनी मृतदेहाचा सांगाडा मिळाल्यानंतर ते नष्ट केले होते. त्याचे डीएनए घेण्यात आलेले नव्हते, अशी माहिती मिळाली. (प्रतिनिधी)
-------------
इंद्राणी मुखर्जीच्या अटकेबाबत वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडून अत्यंत गुप्तता बाळगण्यात येत आहे. याबाबत रायगडचे पोलीस प्रमुख सुवेझ हक यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी मुंबई पोलिसांनी समन्वय ठेवून ही कारवाई केल्याचे सांगितले. त्यांना त्याबाबत आवश्यक असलेली सर्व माहिती देण्यात आली असून, अधिक काही सांगण्यास त्यांनी नकार दिला.