शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

(महत्त्वाचे) केंद्रीय पथकावर शेतकर्‍यांचा संताप

By admin | Updated: August 12, 2015 00:35 IST

फोटोडेस्क - ११बीड/औरंगाबादने पाठविला आहे.-------------------------------------चौसाळा (जि. बीड) येथे शेतकर्‍यांनी केंद्राच्या पाहणी पथकातील अधिकार्‍यांना घेराव घालून व्यथा ऐकण्यास भाग पाडले. दहा मिनिटे शेतकरी बोलत होते आणि अधिकारी गुपचूप ऐकत होते.------------------------पाहणी काही मिनिटांची : मदतीची घोषणा करण्याची मागणीऔरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी दौर्‍यावर निघालेल्या केंद्रीय पथकाला मंगळवारी शेतकर्‍यांच्या संतापाला सामोरे जावे ...


फोटोडेस्क - ११बीड/औरंगाबादने पाठविला आहे.
-------------------------------------
चौसाळा (जि. बीड) येथे शेतकर्‍यांनी केंद्राच्या पाहणी पथकातील अधिकार्‍यांना घेराव घालून व्यथा ऐकण्यास भाग पाडले. दहा मिनिटे शेतकरी बोलत होते आणि अधिकारी गुपचूप ऐकत होते.
------------------------

पाहणी काही मिनिटांची : मदतीची घोषणा करण्याची मागणी

औरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी दौर्‍यावर निघालेल्या केंद्रीय पथकाला मंगळवारी शेतकर्‍यांच्या संतापाला सामोरे जावे लागले. पाहणीचा फार्स नको, काय मदत करणार ते सांगा हा सवाल प्रत्येक ठिकाणी उपस्थित करण्यात आला.
बीड जिल्ह्यातीस चौसाळा आणि औरंगाबाद जिल्ह्यातील रहाटगाव येथे तर शेतकर्‍यांनी गाड्यांचा ताफा अडवून अधिकार्‍यांना दुष्काळाची तीव्रता समजावून सांगितली.
यंदा मराठवाड्यात पावसाने पाठ फिरविल्याने खरीप पीक हातून गेले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय दुष्काळ निवारण विभागाचे अतिरिक्त आयुक्त राघवेंद्रसिंह आणि केंद्रीय फलोत्पादन महामंडळाचे कार्यकारी संचालक ए. के. सिंह, विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांच्यासह संबंधित ठिकाणचे जिल्हाधिकारी, इतर अधिकार्‍यांच्या पथकाने मंगळवारी औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील काही गावांची पाहणी केली.
रहाटगाव येथील शेतकरी आयुक्तांच्या गाडीला आडवे आले. त्यामुळे राघवेंद्रसिंह, डॉ. दांगट यांना खाली उतरावे लागले. आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांनी आणि अन्नदाता शेतकरी संघटनेचे प्रमुख जयाजी सूर्यवंशी यांनी त्यांना मागण्यांचे निवेदन दिले.
जालना जिल्ह्यात पथकाने शेततळे आणि पाण्याअभावी सुकलेल्या पिकांची पाहणी केली. दौर्‍यास विलंब झाल्याने पथकाने वाहनातूनच संत्र्यांच्या बागेचे निरीक्षण केले. बीड जिल्ह्यातील पाडळशिंगी येथे तब्बल दोन तास उशिरा दुपारी दीड वाजता हे पथक पोहचले. मादळमोही शिवाराजवळ काही मिनिटांची पाहणी करून ताफा पुढे निघाला. मादळमोहीच्या एका शेतकर्‍याने ताफा अडवत रस्त्यातील शेताची पाहणी करून साहेब तुम्हाला दुष्काळ काय समजणार ?, जरा आमच्यासोबत चला, म्हणजे आमचा जीव कसा झुरतोय, ते समजेल तुम्हाला, असे सुनावले. पुढे चौसाळ्यातही ताफा अडवून शेतकर्‍यांनी घेराव घातला. त्यांचे आठ-दहा मिनिटे गार्‍हाणे एकेल्यानंतर ताफा पुढे उस्मानाबादसाठी रवाना झाला. उस्मानाबादमध्ये इंदापूर फाट्याजवळ जळालेल्या शेवग्याच्या बागेची पथकाने पाहणी केली. संध्याकाळी सारोळामार्गे पथक लातूरला रवाना झाले. (प्रतिनिधी)
-------------
केंद्र व राज्य शासनाकडे पाहणीचा अहवाल सादर करण्यात येईल. मी बारकाईने काही घटकांचे मूल्यांकन केले आहे. परिस्थिती गंभीर असल्याचे दिसून आले आहे. शेतकर्‍यांसाठी ठोस उपाययोजना होणे गरजेचे आहे. शासनापर्यंत शेतकर्‍यांच्या भावना पोहोचविण्यात येतील. त्यानंतर शासन निर्णय घेईल.
- राघवेंद्रसिंह, अतिरिक्त आयुक्त, केंद्रीय दुष्काळ निवारण विभाग