महत्वाचे....
By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST
खापरी येथे ताजमहदी पुण्यतिथी महोत्सव
महत्वाचे....
खापरी येथे ताजमहदी पुण्यतिथी महोत्सवकाटोल : तालुक्यातील खापरी येथे महाशिवरात्रीला ब्रम्हलीन ताजमहदी बाबा यांच्या पुण्यतिथी महोत्सवाचे मंगळवारी आयोजन करण्यात आले आहे. उत्सवात पूजन, भजन, कीर्तन तसेच शम्मा ताज, सरताज साबरी यांचा कव्वाली कार्यक्रम सादर होईल. महोत्सवाचा अधिकाधिक भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. .....बेवारस विहिरी ठरताहेत धोकादायकनरखेड : तालुक्यातील विविध गावातील विहिरी निकामी झाल्या आहेत. काही विहिरींचा उपयोग कचरा टाकण्यासाठी केला जातो. त्यामुळे विहिरींमधील पाणी सडून दुर्गंधी पसरते. अनेकदा पाणी व अन्नाच्या शोधात जनावरे यात पडून मृत्युमुखी पडत आहेत. ....सांडपाण्यामुळे गावात दुर्गंधीपारशिवनी : सर्वत्र स्वच्छता अभियान सुरू असताना गावात स्वच्छतेबाबत उदासीनता असल्याचे दिसते. ग्रामस्थ घर परिसरातील सांडपाण्याच्या नाल्या व घन कचरा साफ करीत नसल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहते. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ....बंधाऱ्यातील गाळ उपसण्याची मागणी भिवापूर : तालुक्यातील नदीवर असलेले अनेक गावाजवळील बंधारे गाळाने बुजले आहेत. त्यामुळे साठवण क्षमता कमी झाली आहे. या बंधाऱ्यातील गाळ उपसण्याची मागणी होत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. .....संरक्षक कठडे नसल्याने अपघाताचा धोकाकळमेश्वर : तालुक्यातील विविध मार्गावरील पुलावर संरक्षक कठडे नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणच्या पुलावरील कठडे तुटले आहेत. त्यामुळे प्रवास धोक्याचा झाला असून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. याकडे संबंधित विभागाने लक्ष पुरवावे, अशी मागणी आहे.