महत्वाचे....
By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST
मोहपा येथे गुणवंतांचा गौरव
महत्वाचे....
मोहपा येथे गुणवंतांचा गौरवमोहपा : स्थानिक शिक्षण मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा नुकताच गौरव करण्यात आला. यावेळी रश्मी ढोले, सौरभ हावरे, मुग्धा धर्माधिकारी, प्रीती केचे, शुभांगी बागडे आदींना गौरविण्यात आले. कार्यक्रमाला कुंदा विजयकर, प्राचार्य दामोदर चाफले, मुख्याध्यापिका रेखा शेंडवरे, ढवळे, डॉ. एम. व्ही. कोल्हे, भाऊराव सुपले आदी उपस्थित होते.....उघड्यावरील पदार्थांमुळे आरोग्य धोक्यातउमरेड : शहरासह तालुक्यातील अनेक खेड्यापाड्यातील आठवडी बाजारात उघड्यावरच खाद्यपदार्थांची विक्री केली जात असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. बहुतांश बाजारात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खाद्य पदार्थांचे ठेले लागले असतात. त्यावर माशा बसत असल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.....सावरगाव येथे आज मानवाधिकाराचे चर्चासत्रसावरगाव : स्थानिक मानवाधिकार प्रचार केंद्रातर्फे येथील बालपांडे सभागृहात रविवारी ग्रामीण महिलांच्या समस्या आणि अधिकार या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. चर्चासत्रात मानवाधिकारांबाबत विधी विभागातील तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. कार्यक्रमाचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.....दंढार सादर करणाऱ्या कलावंतांना मानधन द्याखात : ग्रामीण भागातील अनेक कलावंत गेल्या २०-२५ वर्षांपासून दंढारीच्या प्रयोगातून लोककला जोपासण्याचे काम करीत आहेत. दंढार सादर करणाऱ्यांमध्ये दोन पिढ्यांतील कलावंतही काम करतात. या कलावंतांना शासनाने मानधन द्यावे, अशी मागणी कलावंतांकडून होत आहे. ....ग्रामीण भागातील एसटीचे वेळापत्रक कोलमडलेनागपूर : जिल्ह्यातील विविध आगारातून धावणाऱ्या एसटी बसचे वेळापत्रक कोलमडल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. खेड्यापाड्यासाठी सुटणाऱ्या बसेस वेळेत लागत नसल्याने प्रवाशांना तासन्तास बसची प्रतीक्षा करावी लागते. यात सुधारणा करण्याची मागणी आहे.