महत्वाचे....
By admin | Updated: January 22, 2015 00:07 IST
मिरचीवर रोगांचा प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल
महत्वाचे....
मिरचीवर रोगांचा प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिलनिहारवाणी : परिसरात मोठ्या प्रमाणात मिरचीचे पीक घेतले जाते. मिरची पिकावर चुरडा व इतर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. पिकांवर विविध कीटकनाशक औषधी फवारणी केल्यानंतरही रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी हताश आहेत. कृषी विभागाने तज्ज्ञांचे मार्गदर्शन व रोग प्रतिबंधक औषधी उपलब्ध करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे......पशुवैद्यकीय विभागातील रिक्त पदे भरानागपूर : जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यात अनेक पदे मागील काही वर्षांपासून रिक्त आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जनावरांवर वेळीच उपचार होत नाही. उपचार न मिळाल्याने अनेकांकडील गुरे दगावतात. अनेक पशुवैद्यकीय दवाखान्यात कर्मचारी उपलब्ध नसल्याने शिपाईच कारभार सांभाळतात. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते......खड्ड्यांमुळे अपघातात वाढमौदा : तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांची दुर्दशा झाली असून मार्गात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्त्यातील खड्ड्यांमुळे अपघातात वाढ झाली आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने खड्डे बुजविण्यासाठी कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. .....घाणीमुळे नागरिकांत अंसतोषसावनेर : स्थानिक शहरातील मुख्य ठिकाणी घाण पसरली आहे. याबाबत नगर परिषद प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे नागरिकांत असंतोष निर्माण होत आहे. अनेक वस्त्यात कचऱ्याचे ढिगारे साचले असतात. त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. नगरसेवक व प्रशासनाने स्वच्छतेकडे लक्ष पुरवावे, अशी मागणी आहे. ......भारनियमनामुळे शेतकरी त्रस्तनिहारवाणी : ऐन हंगामाच्या काळात वीज वितरण कंपनीने भारनियमनाचा सपाटा सुरू केल्याने शेतकरी त्रस्त आहेत. रबी हंगामातील हरभरा, गहू, मिरची पिकांना ओलिताची गरज आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात भारनियमन होत असल्याने पिकांना पाणी देणे शक्य होत नाही. थंडीच्या दिवसांत शेतकऱ्यांना रात्रीच्या सुमारास ओलित करावे लागत आहे. दिवसा होणारे भारनियमन बंद करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी आहे.