महत्वाचे....
By admin | Updated: February 18, 2015 00:12 IST
धामणा जि. प. शाळेसमोर डुकरांचा ठिय्या
महत्वाचे....
धामणा जि. प. शाळेसमोर डुकरांचा ठिय्याधामणा : येथील जि. प. शाळेच्या प्रवेशद्वारासमोरच डुकरांचा वावर राहत असल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो. डुकरांच्या कळपांमुळे शाळा परिसरात घाण व दुर्गंधीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. स्थानिक प्रशासनाने डुकरांचा बंदोबस्त लावावा, अशी पालकांची मागणी आहे. ....अप्रमाणित वजन काट्यांचा वापरनागपूर : ग्रामीण भागातील बहुतांश बाजारामध्ये अप्रमाणित वजन काट्यांचा वापर होत असल्याने ग्राहकांची सर्रास लूट सुरू आहे. अनेक भाजी विक्रेते व दुकानदार वजनाऐवजी दगड व इतर वस्तू ठेवत आहे. आठवडी बाजारात वजनांऐवजी चक्क दगड वापरले जातात. कोणत्याही वजनाचे प्रमाणिकरणही केलेले नसते. याकडे ग्राहक मंचाने लक्ष देऊन अप्रमाणित वजनांवर बंदी आणावी, अशी मागणी आहे. .....कामठीत आज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरकामठी : पोलीस स्टेशन व तालुका पत्रकार संघातर्फे बुधवारी सकाळी ८ वाजता स्थानिक पोलीस ठाण्याच्या प्रांगणात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ॲड. सुलेखा कुंभारे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमित काळे, नगराध्यक्ष रिजवाना कुरेशी, उपाध्यक्ष रणजित सफेलकर आदींची उपस्थिती राहणार आहे. ....ग्रामीण खेळांची जागा घेतली क्रिकेटनेरामटेक : बदलत्या युगाचा परिणाम आता ग्रामीण भागातही जाणवत आहे. पूर्वी खेड्यापाड्यात खेळल्या जाणाऱ्या खेळावरही व्हीडिओ गेम आणि क्रिकेटने ताबा मिळविला आहे. शहराप्रमाणे गावातही आता क्रिकेटचे वेड लागले आहे. परिणामी मैदानी खेळ आता लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत......समाजमंदिर व सभामंडप दुर्लक्षितसावनेर : लोकप्रतिनिधींनी तालुक्यात स्थानिक विकास निधीद्वारे गावागावांत समाजमंदिर बांधले. परंतु सध्या ही अवैध धंद्यांची केेंद्र बनली आहेत. या समाजमंदिरात गावातील तरुण मंडळी पत्त्याचे तास खेळताना दिसतात. तालुक्यातील अनेक गावात असलेल्या समाजमंदिर इमारतीची दैनावस्था झाली आहे......शिकवणी वर्गाच्या फॅडमुळे शाळांकडे दुर्लक्षकोराडी : शिक्षण विभागाचा नियम पायदळी तुडवीत अनेक शिक्षकांनी खासगी शिकवणी वर्ग सुरू केले आहेत. याबाबत शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती असतानाही, शिक्षकांवर कारवाई करण्यास अधिकारी धजावत नाही.