शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
3
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
4
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
5
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
6
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
7
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
8
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
9
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
10
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
11
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
12
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
13
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
14
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
15
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
16
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
17
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
18
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
19
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
20
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू

वेतन आयोगाची अंमलबजावणी लांबणार

By admin | Updated: December 10, 2015 23:37 IST

अत्यंत किचकट आणि गुंतागुंतीच्या शिफारशींमुळे सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी लांबली असल्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाशी संबंधित सूत्रांनी सांगितले.

नवी दिल्ली : अत्यंत किचकट आणि गुंतागुंतीच्या शिफारशींमुळे सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी लांबली असल्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाशी संबंधित सूत्रांनी सांगितले. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांमधील सर्व घटकांचे समाधान करणे अवघड काम असल्याचेही सूत्रांनी स्पष्टकेले.सूत्रांनी सांगितले की, सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची अधिसूचना निघायला सहा महिने लागतील, असे दिसते. कर्मचाऱ्यांना तोपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. विविध विभागांशी संबंधित गुंतागुंतीच्या शिफारशींमुळे अधिसूचना काढण्यास उशीर होणार आहे. सातव्या वेतन आयोगाने आपला अहवाल सादर करण्यासाठी २१ महिन्यांचा काळ घेतला. आता त्याच्या अंमलबजावणीसाठी सरकार आणखी काही महिने घेईल.अर्थमंत्रालयाचा खर्च विभाग वेतन आयोगाच्या शिफारशींची छाननी करीत आहे. आयोगाने कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात सरासरी १६ टक्के वाढ सुचविली आहे. तथापि, अर्थमंत्रालयाचा खर्च विभाग छाननीअंती सर्व विभागातील कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात २0 ते २४ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची शिफारस करणार आहे. ही शिफारस मंजुरीसाठी अर्थमंत्रलयाकडे पाठविण्यात येईल. त्यानंतर हा प्रस्ताव सचिवांच्या गटासमोर ठेवला जाईल. अंतिमत: मंत्रिमंडळाची मंजुरी घेतलीजाईल. कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या विविध भत्त्यांत दुपटीने वाढ करण्याचा विचार अर्थमंत्रालय करीत आहे. वास्तविक हे भत्तेच रद्द करण्याची शिफारस आयोगाने केली होती. जोखीम भत्ता, छोटे कुटुंब भत्ता, सणांची उचल, मोटारसायकल उचल यांचा त्यात समावेश आहे.याशिवाय काही विभागातील कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीत कपात करण्याची शिफारही आयोगाने केली होती. येथेही अर्थमंत्रालय आयोगाच्या विरोधात जाणार आहे, असे दिसते. सध्याची श्रेणीच कायम ठेवण्याचा अर्थमंत्रालयाचा मानस आहे, असे सूत्रांनी सांगितले.