नवी दिल्ली : इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर एकदम वादात सापडली असली तरी देशाच्या निवडणूक आयोगाने या यंत्रांमध्ये कोणत्याही प्रकारचा बेकायदेशीर फेरफार करता येत नसल्याचा निर्वाळा दिला आहे. या यंत्रांच्या अचूकतेवर आमचा पूर्ण विश्वास असून त्यात कोणताही बेकायदेशीर बदल करता येत नाही. या यंत्रांच्या कामगिरीबद्दल जे बेछूट आरोप झाले ते निराधार व म्हणूनच फेटाळून लावण्याच्या लायकीचे आहेत, असे आयोगाने म्हटले. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार आजपर्यंत राज्यांमध्ये या यंत्रांद्वारे १०७ व लोकसभेच्या तीन निवडणुका व्यवस्थित पार पडल्या. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांसाठी दहा लाख ईव्हीएम वापरण्यात आली व त्या निवडणुकांचा निकाल सगळ््यांनी मान्यही केला. ईव्हीएम पर्यावरणाचे संरक्षण करणारी मतपत्रिकांचा वापर करण्यात आलेल्या शेवटच्या निवडणुकीसाठी ७-८ हजार टन कागद लागला होता व हा कागद पूर्ण वाढ झालेली एक लाख २० हजार झाडे तोडून तयार करावा लागला होता. हा विचार केला तर ईव्हीएम पर्यावरणाचे संरक्षण करणारी व फेरवापर करता येणारी असल्याचे माजी निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी म्हटले इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांत नियमबाह्य व बेकायदा बदल करता येतो, असे प्रात्यक्षिक अजून कोणी दाखवून देऊ शकलेले नाही, असे झैदी यांनी सांगितले.
मतदान यंत्रांमध्ये फेरफार करणे अशक्यच
By admin | Updated: March 27, 2017 01:32 IST