शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आयआयटी फी झाली दोन लाख रुपये

By admin | Updated: April 8, 2016 02:54 IST

प्रतिष्ठित आयआयटींमधील शिक्षण आता चांगलेच महागले असले, तरी काही श्रेणींना सवलतींचा दिलासा मिळाला आहे. सरकारने येत्या शैक्षणिक वर्षापासून पदवीपूर्व अभ्यासक्रमासाठी सध्या ९० हजार

नवी दिल्ली : प्रतिष्ठित आयआयटींमधील शिक्षण आता चांगलेच महागले असले, तरी काही श्रेणींना सवलतींचा दिलासा मिळाला आहे. सरकारने येत्या शैक्षणिक वर्षापासून पदवीपूर्व अभ्यासक्रमासाठी सध्या ९० हजार रुपये असलेल्या शुल्कात भरमसाट म्हणजे, १२२ टक्के वाढ करताना ती फी दोन लाख रुपये केली आहे. अनुसूचित जाती-जमाती, दिव्यांग (भिन्नदृष्ट्या सक्षम), तसेच आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटातील विद्यार्थ्यांना फी पूर्णपणे माफ करीत मोफत शिक्षण दिले जाणार आहे.मानव संसाधन विकास मंत्रालयाने अनुसूचित जाती-जमाती, दिव्यांग, तसेच वार्षिक एक लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांना शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेतला असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. वार्षिक पाच लाख रुपये उत्पन्न असलेल्यांना दोन-तृतीयांश शुल्क माफ केले जाणार असून, कोणत्याही श्रेणीत न बसणाऱ्या विद्यार्थ्यांना व्याजमुक्त कर्ज दिले जाईल. उच्चस्तरीय आयआयटी पॅनलने शुल्कवाढीचा ठेवलेला प्रस्ताव मान्य करीत सरकारने हा निर्णय घेतला. (वृत्तसंस्था)जुन्या विद्यार्थ्यांसाठी आधीचीच शुल्करचना...आयआयटींमध्ये नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फी वाढीचा दणका बसणार असला, तरी जुन्या विद्यार्थ्यांना या आधीच्याच शुल्करचनेनुसार फी द्यावी लागेल. आयआयटी रुरकीचे अध्यक्ष अशोक मिश्रा यांच्या नेतृत्वातील पॅनलने गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत पुढील शैक्षणिक सत्रापासून ट्युशन फी सध्याच्या ९० हजार रुपयांवरून तीन लाख रुपयांपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव ठेवला होता. सर्व आयआटींबाबत धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या आयआयटी कौन्सिलच्या अध्यक्षपदी असलेल्या मानव संसाधन विकासमंत्री स्मृती इराणी यांनी अंतिम निर्णय घेताना शुल्क दोन लाख रुपये केले. गेल्या वर्षीचा शुल्कात तीन पट वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला गेला होता.