जुनी हायकोर्ट इमारत दुर्लक्षित
By admin | Updated: January 22, 2015 00:06 IST
नागपूर : हायकोर्टाच्या जुन्या इमारतीसंदर्भात महानगरपालिका उदासीन असल्याची बाब पुढे आली आहे. इमारतीच्या देखभाल व दुरुस्तीसाठी स्थापन समितीच्या अध्यक्षांनी सप्टेंबर-२०१४ मध्ये नगररचना विभागाचे सहायक संचालकांना पत्र लिहून विविध गोष्टींची मागणी केली होती. परंतु, या पत्राला अद्यापही उत्तर देण्यात आले नाही.
जुनी हायकोर्ट इमारत दुर्लक्षित
नागपूर : हायकोर्टाच्या जुन्या इमारतीसंदर्भात महानगरपालिका उदासीन असल्याची बाब पुढे आली आहे. इमारतीच्या देखभाल व दुरुस्तीसाठी स्थापन समितीच्या अध्यक्षांनी सप्टेंबर-२०१४ मध्ये नगररचना विभागाचे सहायक संचालकांना पत्र लिहून विविध गोष्टींची मागणी केली होती. परंतु, या पत्राला अद्यापही उत्तर देण्यात आले नाही.हायकोर्टाची जुनी इमारत हेरिटेज असून तिच्या दुरवस्थेची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वत:हून दखल घेऊन जनहित याचिका दाखल केली आहे. या इमारतीत आता पुरातत्व विभागाचे कार्यालय आहे. न्यायालयीन मित्र ॲड. ए. सी. धर्माधिकारी यांनी बुधवारी सुनावणीदरम्यान इमारतीच्या सध्याच्या परिस्थितीवर प्रकाश टाकला. दरम्यान, वरील बाब पुढे आली. समिती अध्यक्षांनी कार्यक्षेत्र, जुन्या समितीच्या अभ्यासाची माहिती व आवश्यक सुविधा देण्याची मागणी केली आहे. त्यांच्या पत्राला का उत्तर देण्यात आले नाही यावर दोन आठवड्यांत स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश न्यायालयाने महापालिकेला दिले आहेत.