शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटी कपातीवेळी सूचनांकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 22:39 IST

महसुलावर विपरीत परिणामांची शक्यता; पीयूष गोयल यांनी परस्पर घेतला निर्णय

नवी दिल्ली : जीएसटीच्या दरात कपातीचा निर्णय घेताना केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी अधिकाऱ्यांच्या सूचनांकडे सपशेल दूर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. गोयल यांनी परस्पर निर्णय घेतल्याने या कर कपातीचा देशाच्या तिजोरीवर परिणाम होणार आहे.राज्यांच्या अर्थमंत्र्यांचा समावेश असलेल्या जीएसटी परिषदेने शनिवारी बैठकीत अनेक वस्तुंवरील जीएसटीच्या दरांत कपात केली.काही राज्यांच्या विधानसभा तसेच लोकसभा निवडणुका जवळ आल्याने गोयल यांनी हा निर्णय घेतला, हे उघड आहे. मात्र महसुलाला वार्षिक किमान ८ ते १० हजार कोटींचा फटका बसेल,असे अर्थ खात्यातील वरिष्ठ अधिकाºयांना वाटत आहे.अर्थ मंत्रालयातील अधिकाºयांनी सांगितले की, याआधीच्या पद्धतीनुसार दर कपातीआधी मंत्रालयातील ‘फिटमेंट समिती’ त्याचा अभ्यास करीत असे. समितीने हिरवा कंदील दिला तरच करामध्ये कपातकरणण्याचा निर्णय घेण्यात येत असे. पण अलिकडच्या काळात अनेक वेळा अर्थमंत्र्यांनी परिषद बैठकीमध्ये अजेंड्यावर नसलेले कर कपातीचे निर्णय अचानक घेण्यात आले आहेत. शनिवारच्या बैठकीतही असेच निर्णय घेण्यात आले. ‘फिटमेंट समिती’ने ५०० रुपयापर्यंतच्या पादत्राणांवरील जीएसटी ५ टक्क्यांवर आणण्याला नकार दिला. पण काही राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या आग्रहाखातर गोयल यांनी ५०० रुपयांची मर्यादा अचानक १००० रुपयांवर नेली. त्यामुळे आपोआपच कर कपात झाली आहे. त्यातून महसुलाचे नुकसान होईल, असे अधिकाºयांचे म्हणणे आहे.> हवाई इंधनावरील अधिभार फेटाळलाजवळपास १०० वस्तूंवर कर कपात करताना महसूल भरुन काढण्यासाठी हवाई इंधनावर अधिभार लावण्याचे जीएसटी परिषदेने निश्चित केले होते. यामुळे विमानाची तिकीटे महाग होण्याची भीती असल्याने उद्योजकांच्या दबावात हा विषय बैठकीच्या अजेंड्यावर असतानाही ऐनवेळी टाळण्यात आला.> आता २८ टक्क्यांत फक्त ३५ वस्तूजीएसटी परिषदेने अनेक वस्तुंवरील कर कमी केल्यानंतर आता २८ टक्के श्रेणीत ३५ वस्तू शिल्लक आहेत. आतापर्यंत १९१ वस्तूंवरील कर कमी केला आहे. सुरुवातीला त्यात २२६ वस्तू होत्या. पण विविध दबावामुळे २८ टक्क्यांच्या श्रेणीत असलेल्या वस्तूंवरील कर कमी करण्याची वेळ जीएसटी परिषदेवर आली. काही वस्तू २८ टक्क्यांच्या श्रेणीतून १८ टक्क्यांवर आणल्या. यामुळे त्या श्रेणीत चारचाकी व दुचाकी गाड्या, सीमेंट, गाड्यांचे सुटे भाग, टायर्स, विमाने, हेलिकॉप्टर्स, हवाई वाहतुकीशी संबंधित सुटे भाग, तंबाखू, सिगारेट व पान मसाला यांचा समावेश आहे.

टॅग्स :GSTजीएसटीpiyush goyalपीयुष गोयल