शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिराचा विरोध केला तर शिरच्छेद करू: भाजपा आमदार

By admin | Updated: April 9, 2017 18:10 IST

अयोध्यामध्ये राम मंदिर बांधण्यावरून भाजपाचे आमदार राजा सिंग यांनी वादग्रस्त विधान केलं

ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 9 - अयोध्यामध्ये राम मंदिर बांधण्यावरून भाजपाचे आमदार राजा सिंग यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. जर कोणी राम मंदिर बांधण्याचा विरोध केला तर त्याचा शिरच्छेद करू असं ते म्हणाले आहेत. हैदराबादमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलंय. 
 
"राम मंदिर बांधल्यास गंभीर परिणामांचा सामना करावा लागेल असं म्हणणा-यांना मी सांगू इच्छितो, आम्ही तुमच्या अशाच विधानाची वाट पाहत होतो, जेणेकरून आम्ही तुमचा शिरच्छेद करू शकतो" असं ते म्हणाले. यापुर्वीही राजा सिंग यांनी चिथावणीखोर वक्तव्य केली आहेत. राजा यांनी मध्यंतरी फेसबुकवर व्हिडीओ टाकून दलितांना मारहाण करण्याचं समर्थन केलं होतं. जे दलित गोमांस खातात आणि गायींची हत्या करताता त्यांना अशाच प्रकारे मारहाण केली जावी असं ते म्हणाले होते. 
 
6 डिसेंबर1992 मध्ये बाबरी मशीद पाडण्यात आल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेलं. अजून या प्रकरणी न्यायालयाने निकाल दिलेला नाही.  याप्रकरणी न्यायालयाबाहेर तोडगा काढावा, असा सल्ला काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने दिला होता तसेच याप्रकरणी मध्यस्ती करण्याची तयारीदेखील सर्वोच्च न्यायालयाने दाखवली. बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह 14 जणांवर खटला सुरु आहे.  राम मंदिर आणि बाबरी मशिदीचा वाद अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.