शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘बाबा’ पालकामध्ये व्हिटॅमिन डी डेफिशिअन्सी असेल तर तुमचं बाळही असू शकतं खुंटित, खुरटं आणि अशक्त

By admin | Updated: May 19, 2017 17:12 IST

नवं संशोधन सांगतं, तुम्हाला तुमचं बाळ जर हवं असेल हेल्दी, तर आईबरोबर बाबाही हवेत सुदृढ, निरोगी, निर्व्यसनी..

 - मयूर पठाडे

 
भारतासारख्या देशात सूर्यप्रकाश अत्यंत मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, तरीही सूर्यप्रकाशाच्या अभावी मानवी शरीरात ज्या कमतरता निर्माण होतात त्यानं बहुतांश भारतीय पिडीत आहेत, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. नुकत्याच केलेल्या एका संशोधनानुसार तर आता हेदेखील सिद्ध झालं आहे की वडिलांमध्ये जर व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तर त्याचे दुष्परिणाम त्यांच्या मुलांनाही भोगावे लागू शकतात. अशा पालकांच्या मुलांची उंची आणि वजन खुंटित राहू शकते असा या संशोधनाचा निष्कर्ष आहे. 
 
 
व्हिटॅमिन डी ची कमतरता मुख्यत: कशामुळे होते तुम्हाला माहीत आहे? 
सूर्यप्रकाशामुळे अत्यंत सहजपणे तुम्हाला व्हिटॅमिन डी मिळू शकते. सूर्यप्रकाश मिळावा म्हणून अनेक परदेशी नागरिक एकीकडे सनबाथ घेताना आपल्याला दिसतात, तर उन्हाचा त्रास नको म्हणून आपण शक्य तितकं उन्हाला टाळण्याचा आणि उन्हापासून वाचण्याचा प्रय} करतो. मग त्यासाठी अगदी उन्हात न जाण्यापासून तर फूल बाह्यांचे कपडे घालणे, डोक्यापासून तर पायाच्या नखापर्यंत सर्वांग झाकून घेणं, सनस्क्रीन लावणं. यासारखे अनेक ‘उपाय’ आपण योजतो. गरजेपुरताही सूर्यप्रकाश आपण आपल्या शरीराला लागू देत नाही,  पण त्याचमुळे स्वच्छ सूर्यप्रकाशाच्या या देशात अनेक जणांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता आहे हे सत्य आहे. 
आयर्लंड येथील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सिलिया लॅँचेरॉस यांनी अनेक वर्षे पालक आणि त्यांच्या मुलांचा अभ्यास करून हा निष्कर्ष नुकताच पोतरुगाल येथील युरोपिअन कॉँग्रेस ऑफ ओबेसिटीला (इसीओ) सादर केला आहे. 
या अभ्यासाचा मुख्य रोख होता, पालकांमध्ये, त्यातही वडील पालकामध्येच जर व्हिटॅमिनी डी डेफिशिअन्सी असेल तर त्यांच्या मुलांमध्ये, मुलांच्या वाढीवर त्याचा परिणाम होतो का? होत असल्यास काय परिणाम होतो?
त्यासाठी डॉ. सिलिया यांनी नवविवाहित जोडपी निवडली, ज्यांना अजून मूल झालेलं नाही. मूल होण्याच्या आधीच त्यांनी दोन्ही पालकांची; त्यातही खासकरून पुरुष पालकांची तपासणी केली. त्यांच्यात व्हिटॅमिन डीचं प्रमाण किती आहे, याची नोंद केली. त्यांना मुलं झाल्यानंतर ही मुलं पाच आणि नऊ वर्षांची झाल्यानंतर त्या मुलांचाही अभ्यास केला. त्यासाठीचं एक खास मॉड्यूलही विकसित केलं. 
अनेक पातळ्यांवर आणि अत्यंत दीर्घ असा हा अभ्यास होता. 
 
काय होता हा अभ्यास?
 
 
पुरुष पालकाचं वय, त्याच्या शरीरातील व्हिटॅमिन डीचं प्रमाण, त्याचं वजन, आई पालकाचं वय, तिच्यातील व्हिटॅमिन डीचं प्रमाण, तिचं वजन, त्यानंतर जन्माला आलेल्या बाळाचं लिंग, त्याचं वय, त्याच्यातील व्हिटॅमिन डीचं प्रमाण, मूल पाच वर्षांचं झाल्यानंतर विशेषत: उन्हाळ्यातील त्याची फिजिकल अँक्टिव्हिटी. या सार्‍या गोष्टींचा अत्यंत तपशीलात जाऊन अभ्यास करण्यात आला. पालकांमधील कमी किंवा पुरेशा व्हिटॅमिन डीचा त्यांच्या मुलांवर काय परिणाम होतो अशा प्रकारचा हा अभ्यास पहिलाच अभ्यास मानला जात आहे. 
 
काय आहे निष्कर्ष?
हा अभ्यास सांगतो, वडिलांमध्ये जर मुलाच्या जन्मापूर्वी व्हिटॅमिन डी डेफिशिअन्सी असेल तर मुलांच्या वाढीवर त्याचा निश्चितच दुष्परिणाम होऊ शकतो. 
आश्चर्याची गोष्ट म्हणजे आईमध्ये असलेल्या व्हिटॅमिन डीच्या प्रमाणाचा मुलांवर कोणताही परिणाम होत नाही असं या अभ्यासातून समोर आलं. 
 
आई बरोबर बाबाही हवेत सुदृढ
 
 
बाळाच्या जन्मापूर्वी आईचीच तेवढी तब्येत सुदृढ असली पाहिजे असं आपल्याकडे मानलं जातं. आपल्याबरोबरच जगात बर्‍याच ठिकाणीही असाच समज आहे. पण हा समज या नव्या संशोधनानं पुन्हा एकदा खोडून काढला आहे. बाळाच्या जन्मापूर्वी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आई जेवढी सुदृढ हवी तेवढाच बाबाही सक्षम असला पाहिजे. 
त्यामुळे बाबा पालकांनो लक्षात ठेवा, तुमचं बाळ जर तुम्हाला निरोगी आणि सुदृढ हवं असेल, तर तुम्हालाही तसंच असायला हवं. आपल्याला जर काही वाईट सवयी असतील, सुदृढ नसाल तर आधी आपल्या तब्येतीकडे लक्ष द्या आणि मगच बाळाला जन्म देण्याचा विचार करा..