शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

...तर आत्मदहन करू, संतप्त खान कुटुंबीयांचा इशारा

By admin | Updated: April 18, 2017 13:26 IST

जयपूरमधील पेहलू खान हत्येप्रकरणात न्याय मिळाला नाही तर आत्मदहन करू, कुटुंबीयांचा आक्रमक इशारा.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 18 - हरियाणा येथील दुग्धउत्पादक शेतकरी पेहलू खान यांची गो तस्कर म्हणून कथित गोरक्षकांनी काही दिवसांपूर्वी हत्या केली.  याप्रकरणी न्याय मिळाला नाही तर आत्मदहन करणार, असा आक्रमक इशारा पेहलू खान यांच्या कुटुंबीयांनी दिला आहे. 
 
"घटना घडून दोन आठवडे लोटले मात्र तरीही मुख्य आरोपीला अद्यापपर्यंत अटक करण्यात आलेली नाही", असे सांगत पेहलू यांचा भाचा अब्दुल कयूम यानं तपासावर नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय, यावेळी आत्मदहनाचा इशाराही दिला. 
 
कयूम आणि त्यांचे अन्य नातेवाईक नागरिक अधिकार संघटना पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज यांच्या नेतृत्वात होणा-या निदर्शनात सहभागी होण्यासाठी जयपूर येथे आले होते. यावेळी कयूम यांनी सांगितले की, "आम्हाला मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची भेट घ्यायची होती. मात्र त्या ओडिशामध्ये असल्याचे आम्हाला माहिती नव्हते.  जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही जयपूरमध्ये येत राहणार".
 
तर दुसरीकडे पेहलू यांचे काका हुसैन यांनी सांगितले की, "जर पेहलू यांना जयपूर किंवा गुडगाव येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले असते तर कदाचित त्यांचा जीव वाचू शकला असता. दरम्यान, या घटनेनंतर संपूर्ण कुटुंबीय दहशतीखाली आहे. पेहलू यांची मुल इरशाद आणि आरिफ दोघंही अजून सावरू शकलेली नाहीत". 
(अरेरे ! तस्कर नव्हे शेतक-याची केली हत्या)
 
काय आहे नेमकी घटना?
हरियाणातील मेवात येथील दुग्धउत्पादक शेतकरी पेहलू खान (५५) यांनी दुभती म्हैस विकत घेण्याऐवजी दुभती गाय विकत घेतली आणि त्यांना तस्कर समजून कथिक गोरक्षकांनी ठारच मारले.  पेहलू खान यांना गाईंची तस्करी करत असल्याच्या आरोपाखाली काही जणांकडून भररस्त्यात मारहाण करण्यात आली. या मारहाणीत जबर जखमी झालेल्या पेहलू खान यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.  पेहलू खान यांच्यासहित एकूण पाच जणांना बेदम मारहाण करण्यात आल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. 
(गाईंची वाहतूक करणा-यांना जबर मारहाण, एकाचा मृत्यू)
पेहलू खान यांना एक म्हैस विकत घ्यायची होती.  दुग्धउत्पादक शेतकरी असल्याने रमजान महिन्यात दुध उत्पादन वाढवून जास्तीत जास्त नफा मिळवावा यासाठी ते प्रयत्न करत होते. पण पेहलू खान यांना विक्रेत्याने त्यांच्यासमोर एका गाईचं 12 लिटर दूध काढून दाखवलं, आणि त्यांनी ती गाय विकत घेण्याचा निर्णय घेतला. विक्रेत्याने माफक किंमत सांगितल्याने पेहलू खान तयार झाले आणि ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरली.
(गोरक्षकांच्या हल्ल्यात दूध व्यावसायिक ठार!)
 
पेहलू खान यांचा मुलगा इरशादही त्यादिवशी दुस-या पिकअप ट्रकमधून प्रवास करत होता. त्या ट्रकमध्ये दोन गाई आणि वासरं होती. "वडिलांना गाडीतून खेचून बाहेर काढत मारहाण करण्यात आली. त्यांना काठ्या, पट्ट्याने मारहाण सुरु होती. त्यांच्यासोबत इतर चौघांनाही मारण्यात आलं", असं इरशाद सांगतो. "घटनेनंतर अर्ध्या तासाने पोलीस पोहोचले", असल्याचा आरोप इरशादने केला होता. तोपर्यंत वडील पूर्णपणे बेशुद्ध झाले होते. 
 
पेहलू खान हरियाणाचे रहिवासी होते. पशु मेळामधून त्यांनी या गाईंना विकत घेतलं होतं. त्यांनी कागदपत्रं सादर करुनही त्यांना मारहाण करण्यात आली. गाडीतून बाहेर खेचून, पाठलाग करुन त्यांना मारहाण करण्यात आल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. यावेळी त्यांच्या पिक अप व्हॅनचीही तोडफोड करण्यात आली. यावेळी आपले वडील आणि इतरांकडील 35 हजार रुपयेही लुटून नेण्यात आल्याचा आरोप इरशादने केला.