शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेत आल्यास ईशान्य भारतात बीफ बंदी नाही - भाजपा

By admin | Updated: March 27, 2017 22:10 IST

एकीकडे उत्तर प्रदेशात निवडणूक प्रचारादरम्यान भारतीय जनता पार्टीने बीफ बंदी करण्यावर जोर दिला होता तर आता ईशान्य भारतात...

ऑनलाइन लोकमत
गुवाहाटी, दि. 27 - एकीकडे उत्तर प्रदेशात निवडणूक प्रचारादरम्यान भारतीय जनता पार्टीने बीफ बंदी करण्यावर जोर दिला होता तर आता  ईशान्य भारतात सत्तेत आल्यास असे कोणतेही पाऊल उचलणार नाही असं भाजपाने स्पष्ट केलं आहे. ईशान्य भारतातील तीन राज्यांमध्ये पुढील वर्षी निवडणूक होणार आहे.
 
उत्तर प्रदेशात भाजपा सरकारकडून अवैध कत्तलखान्यांविरोधात कारवाईची देशभरात चर्चा सुरु असताना ईशान्य भारतात सत्तेत आल्यास आम्ही बीफ बंदी करणार नाही असं मेघालयमधील भाजपाचे सचिव डेव्हिड खर्सती यांनी म्हटलं आहे.मेघालय, मिझोरम, नागालॅंडमध्ये ख्रिस्ती धर्मीयांची संख्या जास्त आहे तसेच येथे नागरिक मोठ्या प्रमाणात बीफ खातात. 
 
आम्ही उत्तर प्रदेशाप्रमाणेच ईशान्य भारतातही कत्तलखान्यांविरोधात कारवाई करणार आहोत अशी चर्चा ईशान्य भारतात आहे,  ‘हितसंबंध असलेल्या काही गटांकडून जाणीवपूर्वक अशा अफवा पसरवल्या जात आहेत,’ असे खर्सती म्हणाले.   नागालँडमधील भाजपच्या नेत्यांकडूनदेखील पक्ष सत्तेत आल्यास गोहत्या बंदीचा निर्णय घेतला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. नागालँड आणि ईशान्य भारतातील परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे आणि या परिस्थितीची भाजपच्या केंद्रातील नेत्यांना कल्पना आहे,’ असे नागालँड भाजपचे प्रमुख विसासोली लहोंगू यांनी एका हिंदुस्तान टाईम्स या इंग्रजी वर्तमानपत्राशी बोलताना स्पष्ट केले. मेघालय भाजपचे अध्यक्ष जे. व्ही. हलुना यांनीदेखील भाजप सत्तेत आल्यास गोहत्याबंदी करण्यात येणार नाही, असे स्पष्ट केले आहे.