शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

परदेशात अडचणीत सापडल्यास ट्विट करून मला टॅग करा - सुषमा स्वराज

By admin | Updated: January 9, 2017 08:40 IST

परदेशात राहताना एखादी समस्या आल्यास त्याविषयी भारतीय दूतावासाला ट्विट करून त्यामध्ये मलाही टॅग करा असे स्वराज यांनी म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ९ - अडचणीत सापडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असणा-या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या अनेकांसाठी देवदूत ठरल्या आहे. ट्विटरवर नेहमी सक्रीय असणा-या स्वराज यांनी भारतीयांप्रमाणेच इतर नागरिकांनाही वेळोवेळी मदत केली आहे. त्याच स्वराज यांनी परदेशात अडचणीत सापडलेल्या भारतीयांच्या मदतीसाठी आणखी एक पाऊल उचलत त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. 'परदेशात राहताना एखादी समस्या आल्यास त्याविषयी तुम्ही भारतीय दूतावासाला ट्विट करा आणि त्यामध्ये मलाही  टॅग करा' अशी माहिती स्वराज यांनी ट्विटरवरूनच दिली आहे.
 
'परदेशात राहताना एखादी समस्या असल्यास त्या अडचणीबद्दल भारतीय दूतावासाला ट्विट करून सांगा व त्याच ट्विटमध्ये  @sushmaswaraj हे माझे हॅण्डलही टॅग करा. आपत्कालीन परिस्थितीत तुम्हाला याची मदत होईल. तक्रार निवारणासाठी मी तुमच्या ट्विटकडे वैयक्तिकरित्या लक्ष देईन' असे त्यांनी नमूद केले आहे.  ' आपत्कालीन परिस्थितीत कृपया #SOS हा हॅशटॅग नक्की वापरा,' असंही परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटले आहे. तसेच स्वराज यांनी ट्विटर हॅण्डलच्या टाइमलाईनवर विविध देशातील भारतीय दूतावासांची यादीही पोस्ट केली आहे. 
(सुषमा स्वराज यांच्यामुळे पाकिस्तानी वधू पोहोचली भारतात)
(नव्या पासपोर्ट नियमांबाबत सुषमा स्वराज यांनी मागवल्या प्रतिक्रिया)
(एकटाच हनीमूनला गेलेल्या पतीच्या मदतीस धावल्या सुषमा स्वराज)
 
 
 
मदतीस नेहमी तत्पर असणा-या स्वराज यांचे आत्तापर्यंत अनेकांना आभार मानले असून पंतप्रधान मोदींनीही त्यांचे कौतुक केले. मध्यंतरीच्या काळात प्रकृती अस्वास्थ्याचा सामना करावा लागत असतानाही स्वराज यांनी आपली भूमिका कर्तव्यदक्षपणे निभावत अडणचीत सापडलेल्या जोडप्याची मदत केली होती.