शहरं
Join us  
Trending Stories
1
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
2
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
3
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
4
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
5
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
6
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)
8
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय
9
Maharashtra Politics : पक्षात कोण नाराज आहे का? जयंत पाटलांनी दिलं उत्तर; चर्चांना दिला पूर्णविराम
10
IPL 2025 Eliminator : हिटमॅन रोहितनं खास 'ट्रिपल सेंच्युरी'सह रचला इतिहास; जाणून घ्या त्याचा रेकॉर्ड
11
वैष्णवीचे चारित्र्यहनन पूर्णपणे चुकीचे; वकिलांनी बोलताना भान बाळगणे गरजेचे, आयोगाची सूचना
12
KCR कुटुंबात घमासान BRS चा उत्तराधिकारी कोण; केटीआर की के. कविता कुणाला मिळणार कमान?
13
Jonny Bairstow चा बेस्ट शो! पावरप्लेमध्ये 'पर्पल कॅप'सह मिरवणाऱ्या बॉलरलाही धु धु धुतलं
14
Crime : माता न तूं वैरिणी! काळ्या जादुचं भूत चढलं, तांत्रिकासोबत मिळून आईनेच पोटच्या मुलीला विकलं 
15
पाळीव श्वानाने शेजाऱ्याला चावले, कोर्टाने मालकाची केली ४ महिने जेलमध्ये रवानगी, काय आहे प्रकरण?
16
IPL 2025 Eliminator : रोहितला मिळाला नवा ओपनिंग पार्टनर; हार्दिक पांड्यानं या दोघांवरही दाखवला भरवसा
17
भारताचा AMCA प्रोजेक्ट...अमेरिकेचा आश्चर्यकारक प्रस्ताव; रशियानेही दिली मोठी ऑफर
18
उत्पन्न नाही, पीकविमा बँक देईना; पेरणीसाठी पैसे नसल्याने, जीवन संपविण्याची शेतकऱ्याची तयारी
19
Video : तो फ्लॉवर समजला, पण वाघ फायर निघाला! तरुणाला वाघासोबत सेल्फी काढणं पडलं महागात, बघा नेमकं काय झालं...  
20
मोठी बातमी! हगवणे प्रकरणातील निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; नेपाळच्या बॉर्डरपर्यंत पोहोचला होता

दुरुस्ती न केल्यास शाळेला ठोकणार ताळे

By admin | Updated: August 20, 2015 22:09 IST

चौगाव ग्रामस्थांचा जिल्हा परिषदेला इशारा

चौगाव ग्रामस्थांचा जिल्हा परिषदेला इशारा
नाशिक : बागलाण तालुक्यातील ठेंगोडा गटातील चौगाव येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा मोडकळीस आली असून, ती कधीही कोसळण्याची शक्यता आहे. या धोकादायक शाळेतच विद्यार्थी शिक्षण घेत असून, काही दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित करीत चौगाव येथील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने काल (दि.२०) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांची भेट घेऊन प्राथमिक शाळेचे निर्लेखन होऊन शाळेची दुरुस्ती न झाल्यास शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला.
काल जिल्हा परिषद सदस्य शैलेश सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली चौगावच्या शिष्टमंडळाने सुखदेव बनकर यांना निवेदन देऊन चौगावची प्राथमिक शाळा दुरुस्ती करण्याबाबत मागणी केली. चौगाव जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा पाच खोल्यांची असून, ती अत्यंत धोकादायक झाली असून, मोडकळीस आली आहे. शाळा निर्लेखनाचा प्रस्ताव संबंधित विभागास सादर केला असूनही शाळा निर्लेखित होत नसून काही दुर्घटना घडल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे सदरची शाळा तातडीने निर्लेखित करून नवीन पाच शाळा खोल्यांना मान्यता देण्याची कार्यवाही करावी, अन्यथा शाळेला कुलूप ठोकण्यात येईल, असा इशारा शिष्टमंडळाने दिला आहे. शिष्टमंडळात चौगावचे सरपंच लताबाई शेवाळे, उपसरपंच अनिता शेवाळे तसेच शंकर शेवाळे, विशाल गांगुर्डे, मंगला मांडवडे, लक्ष्मण मांडवडे, रानूबाई पवार, आत्माराम पवार, ग्रामसेवक एन. एम. शेख आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)