शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

...तर हत्या टळली असती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 07:18 IST

भिंद्रनवाले दादरच्या गुरुद्वारात होता. समोरचा फ्लॅट गुप्तवार्ता शाखेचे संचालक श्रीकांत बापट यांनी भाड्याने घेतला. तेथून दुर्बिणी घेऊन गुप्तहेर नजर ठेवून होते. तेथून दोन तासांनी माहिती दिली जात असे.

- ज्युलिओ रिबेरो(निवृत्त ज्येष्ठ पोलीस अधिकारी)

भिंद्रनवाले दादरच्या गुरुद्वारात होता. समोरचा फ्लॅट गुप्तवार्ता शाखेचे संचालक श्रीकांत बापट यांनी भाड्याने घेतला. तेथून दुर्बिणी घेऊन गुप्तहेर नजर ठेवून होते. तेथून दोन तासांनी माहिती दिली जात असे.तरीही मुंबई पोलीस व ‘इंटेलिजन्स ब्युरो’ला तुरी देऊन भिंद्रनवाले पसार झाला. त्याला ठार करता आले असते तर पंजाबमध्ये काही ठिकाणी गडबड झाली असती. पण इंदिरा गांधी यांची हत्या टळली असती!इंदिरा गांधी यांच्या हत्येची बातमी आली तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील पुण्यात वरिष्ठ पोलीस अधिकाºयांच्या परिषदेत बोलत होते. आम्ही सर्वांनी आपापल्या मुख्यालयात परतावे आणि या हत्येचे काही हिंसक पडसाद उमटणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे त्यांनी निर्देश दिले. मी मुंबईचा पोलीस आयुक्त होतो. मी लगेच पुण्याच्या कंट्रोल रूममध्ये गेलो व तेथून मुंबईतील कंट्रोल रूमच्या अधिकाºयाशी बोललो. मुंबईत जेथे शीख वस्ती आहे वा त्यांचे व्यवसाय आहेत अशा वडाळा, विक्रोळी, लॅमिंग्टन रोडसारख्या भागांत कडक बंदोबस्त लावण्यास मी सांगितले. शिखांच्या जिवाला वा मालमत्तेला धोका पोहोचेल असे कृत्य करताना कोणी आढळल्यास बंदूक चालविण्याचे स्पष्ट आदेश दिले.इंदिराजींच्या हत्येनंतर दिल्लीत जे लज्जास्पद शिरकाण झाले, त्याची पुनरावृत्ती आमच्या खंबीर उपायांमुळे मुंबईत झाली नाही. दुसºया दिवशी शिवसेनाप्रमुखांनी मला फोन केला व मी पोलिसांना दिलेल्या आदेशाबद्दल त्यांनी आक्षेप घेतला. ‘तुम्ही सरळसरळ गोळ्या घाला, असे आदेश कसे देऊ शकता?’, असा त्यांचा सवाल होता. माझ्या आदेशात ‘जर, तर’ आहे व शिखांवर हल्ले झाले नाहीत, तर गोळ्याही घातल्या जाणार नाहीत, असे मी त्यांना सांगितले.शिखांचे पवित्र व सर्वोच्च धर्मपीठ असलेल्या अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातील ‘अकाल तख्त’ लष्कराने उद््ध्वस्त केल्याचा बदला घेण्यासाठी इंदिराजींची हत्या त्यांच्याच सुरक्षा जवानांनी केली. सुवर्ण मंदिरात लष्कराच्या चिलखती दलाकरवी हल्ला चढविण्याचा निर्णय कसा, का व केव्हा घेतला गेला याची मला कल्पना नाही. मात्र एवढे माहीत आहे की, लष्कराच्या कारवाईला एका शिखाच्या, निवृत्त मेजर जनरल सुभेग सिंगच्या मार्गदर्शनाखाली सुवर्ण मंदिरातून शिस्तबद्ध प्रत्युत्तर दिले गेले, तेव्हा लष्कराने रणगाडे व उखळी तोफांचा वापर केला. मला असेही समजले की, अशा प्रखर प्रतिहल्ल्याची लष्करास पूर्वकल्पना नव्हती. त्यामुळे लष्कराची बरीच प्राणहानी झाली.याउलट १९८६ मध्ये पहिल्या ‘आॅपरेशन ब्लॅक थंडर’च्या वेळी व नंतर १९८८ मध्ये दुसºया ‘आॅपरेशन ब्लॅक थंडर’च्या वेळी पक्की माहिती गुप्तपणे आधीच मिळवून पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने सुवर्ण मंदिरात कारवाई केली तेव्हा प्राणहानी अगदीच कमी झाली. ‘आॅपरेशन ब्लॅक थंडर’ची दुसरी कारवाई तब्बल नऊ दिवस सुरू होती. त्यात पोलिसांच्या नेमबाज बंदूकधाºयांनी मंदिराच्या आवारात फिरणाºया काही सशस्त्र दहशतवाद्यांना अचूक टिपले. शिवाय मंदिराला एवढा पक्का वेढा घातला की तहान व उपासमारीने जीव जायची वेळ आल्याने अतिरेक्यांना शरणागती पत्करण्याला तरणोपाय राहिला नाही. नंतरची ही पोलिसी कारवाई लष्कराच्या कारवाईहून बिनचूक होती. तेच तंत्र १९८४ च्या ‘आॅपरेशन ब्ल्यू स्टार’च्या वेळी का वापरले नाही, याचे मला आश्चर्य वाटते.आॅपरेशन ब्ल्यू स्टारच्या सहा महिने आधी भिंद्रनवालेचा काटा काढण्याचा एक प्रयत्न निष्फळ ठरला होता. भिंद्रनवाले सशस्त्र साथीदारांना घेऊन अमृतसरहून बसने मुंबईला येण्यासाठी निघाला. स्वत:भिद्रनवाले व त्याचे काही अंगरक्षक बसमध्ये बसले होते व त्याचे बाकीचे सशस्त्र साथीदार बसच्या टपावरून प्रवास करीत होते. त्या वेळी मी मुंबईचा पोलीस आयुक्त होतो. ही बस ठाणे जिल्ह्यात असतानाच त्याची माहिती मिळाली. भिंद्रनवालेच्या साथीदारांना नि:शस्त्र करणे हे कायद्याने माझे कर्तव्य होते व ते करण्याचे मी ठरविले. त्यासाठी सशस्त्र संघर्ष करण्याचीही मी तयारी केली होती.परंतु मंत्रालयाच्या आदेशाने माझी योजना कागदावरच राहिली. भिंद्रनवाले मुंबईहून परत जाताना ठाणे जिल्ह्यात एखाद्या निर्जन ठिकाणी गाठून त्याचा ‘समाचार’ घेण्याची आखणी केंद्र सरकारने केली होती. त्यामुळे सबुरीच्या सूचना मिळाल्या. भिंद्रनवालेचा दादर येथील गुरुद्वारात मुक्काम असेल तेव्हा तेथे बारकाईने नजर ठेवून त्याचा दैनंदिन अहवाल केंद्र सरकारकडे पाठविण्याचे काम माझ्यावर सोपविण्यात आले.त्या वेळी राज्य गुप्तवार्ता शाखेचे संचालक श्रीकांत बापट होते. ते आधीपासूनच माझ्या संपर्कात होते व दिल्लीला अहवाल देणे ही आमची संयुक्त जबाबदारी होती. भिंद्रनवाले याचा मुक्काम दादरच्या गुरुद्वारात ज्या खोलीत होता, त्याच्या बरोबर समोरचा एक फ्लॅट बापट यांनी भाड्याने घेतला. तेथून बापट यांच्या विभागाचे गुप्तहेर हातात दुर्बिणी घेऊन भिंद्रनवाले याच्या हालचालींवर नजर ठेवून होते. ‘लक्ष्य’ असलेली व्यक्ती गुरुद्वाराच्या त्याच खोलीत आहे, असा अहवाल दर दोन तासांनी त्यांच्याकडून आमच्याकडे येत असे. आम्हा मुंबईतील मंडळींना भिंद्रनवाले हा काही नित्याच्या परिचयाचा नव्हता. ही टेहळणी करताना भिंद्रनवाले याच्यासारखी दिसणारी दुसरीही व्यक्ती असू शकते, ही शक्यता लक्षात घेतली गेली नाही. मुंबई-दिल्ली महामार्गावर भिंद्रनवाले याचा ‘गेम’ करण्याच्या हालचालींचा त्याच्या समर्थकांना सुगावा लागला. परिणामी भिंद्रनवाले याच्याऐवजी त्याच्यासारख्या दिसणाºया दुसºया व्यक्तीला गुरुद्वाराच्या खोलीत बसवून प्रत्यक्ष भिंद्रनवाले पसार झाला व त्याच्यावर लक्ष ठेवून असलेले गुप्तहेर तो खोलीतच आहे, असे समजत राहिले.अशा प्रकारे मुंबई पोलीस व ‘इंटेलिजन्स ब्युरो’च्या हातावर तुरी देऊन भिंद्रनवाले पसार झाला. आमचा चांगलाच मुखभंग झाला. या अपयशाचा खुलासा करताना आमची चांगलीच भंबेरी उडाली. भिंद्रनवाले भारत सरकारला उघडपणे आव्हान देत आहे. अशा वेळी त्यांचा मुकाबला करण्यासाठी भारत सरकार काय करत आहे, यावरून संसदेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले, तेव्हा इंदिरा गांधींना या फसलेल्या योजनेची कबुली द्यावी लागली होती. आता इतक्या वर्षांनी मागे वळून पाहताना मी एवढेच म्हणू शकतो की, भिंद्रनवाले याला ठार करण्याची ती योजना यशस्वी झाली असती तर पंजाबमध्ये काही ठिकाणी गडबड नक्की झाली असती. पण नंतर भिंद्रनवालेला नेस्तनाबूत करण्यासाठी लष्कराला सुवर्ण मंदिरात शिरून जी कारवाई करावी लागली, ती टळली असती. आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे पंतप्रधान इंदिरा गांधी यांची कदाचित हत्याही झाली नसती!इंदिराजींच्या हत्येनंतर दिल्लीत जे लज्जास्पद शिरकाण झाले त्याची आमच्या खंबीर उपायांमुळे मुंबईत पुनरावृत्ती झाली नाही. दुसºया दिवशी सकाळी शिवसेनाप्रमुखांनी मला फोन केला व मी माझ्या हाताखालच्या पोलिसांना दिलेल्या आदेशाबद्दल त्यांनी आक्षेप घेतला. ‘तुम्ही सरळसरळ गोळ्या घाला, असे आदेश कसा काय देऊ शकता?’, असा त्यांचा सवाल होता. माझ्या आदेशात ‘जर, तर’ आहे व शिखांवर हल्ले झाले नाहीत, तर गोळ्याही घातल्या जाणार नाहीत, असे मी त्यांना सांगितले.

टॅग्स :Indira Gandhi Birth Centenary Yearइंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्ष