शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मुलायमसिंहांना पंतप्रधान केल्यास युती

By admin | Updated: December 5, 2015 09:10 IST

पुढील लोकसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनविल्यास काँग्रेससोबत युतीची आमची तयारी आहे, असा प्रस्ताव

नवी दिल्ली : पुढील लोकसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनविल्यास काँग्रेससोबत युतीची आमची तयारी आहे, असा प्रस्ताव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मांडला आहे. त्यांनी सुचविलेल्या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे उपपंतप्रधान असतील.शुक्रवारी येथे आयोजित एका नेतृत्व परिषदेतील परिसंवादादरम्यान अखिलेश यादव यांनी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेससोबत युतीसाठी आपला हा फॉर्म्युला मांडला. गांधी यांनी मात्र यावर कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. ‘मी समाजवादी असल्याने तुम्ही मला हे विचारत आहात. माझे वडील मला रागवतात असेही आपण म्हणता. नेताजींचे स्वप्न पूर्ण व्हावे आणि मला त्यांच्यासाठी काम करता यावे, अशी माझी सुद्धा इच्छा आहे. त्यांनी पंतप्रधान व्हावे आणि राहुल यांनी उपपंतप्रधान. हा प्रस्ताव स्वीकारार्ह असल्यास मी लगेच आघाडीसाठी तयार आहे’, असे प्रतिपादन उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी केले. भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्याच्या ४२ वर्षीय मुख्यमंत्र्यांनी भाजपा आणि संलग्न संघटनांकडून फूट पाडण्यासोबतच ज्या प्रकारची भाषा वापरली जाते ती बघता त्यांच्यासोबत कुठल्याही प्रकारच्या संबंधांचा प्रश्नच उद्भवत नाही, हे ठासून सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)