शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

कायद्याने हात बांधलेत नाहीतर लाखो लोकांचं धड वेगळं केलं असत - बाबा रामदेव

By admin | Updated: April 4, 2016 11:42 IST

'कायद्याने हात बांधले आहेत नाहीतर भारत माता की जय बोलण्यास नकार देणा-या हजारो, लाखो लोकांची मुंडकी छाटली असती', असं वादग्रस्त वक्तव्य योगगुरु बाबा रामदेव यांनी केलं आहे

ऑनलाइन लोकमत - 
रोहतक, दि. ४ - 'कायद्याने हात बांधले आहेत नाहीतर भारत माता की जय बोलण्यास नकार देणा-या हजारो, लाखो लोकांची मुंडकी छाटली असती', असं वादग्रस्त वक्तव्य योगगुरु बाबा रामदेव यांनी केलं आहे. बाबा रामदेव यांनी भारत माता की जय बोलण्यास नकार देणा-या असदुद्दीन ओवेसींचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
 
'जर कोणी मुंडकं छाटलं तरी भारत माता की जय बोलणार नाही असं म्हणत असेल, तर मला त्यांना सांगायचं आहे की आम्ही कायद्याचा आणि संविधानाचा आदर करतो अन्यथा हजारो, लाखो मुंडकी आम्ही छाटू शकतो', असं वक्तव्य बाबा रामदेव यांनी केलं आहे. 'अशाप्रकारे बोलण्याची लोकांना लाज वाटायला हवी. आपल्या मातृभुमीचा आदर करावा', असंदेखील बाबा रामदेव बोलले आहेत. 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'भारत माता की जय बोलण्यास नकार देणा-यांना देशात राहण्याचा हक्क नसल्याचं' केलेल्या वक्तव्यावरुनदेखील वाद निर्माण झाला होता.  मात्र माध्यमांनी सोयीस्करपणे केवळ ‘भारतमाता की जय’बाबतचा काही भाग उचलून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं.
 
'मी भारत माता की जय अशी घोषणा देणार नाही', असं वक्तव्य ऑल इंडिया मजलीस इत्तेहदुअल मुस्लिमीनचे (एमआयएम) अध्यक्ष तथा हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी लातूरच्या उदगीरमधील रॅलीमध्ये केलं होतं.  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुलांना भारत माता की जय घोषणा देण्यास शिकवावं लागेल असं म्हटलं होत, त्यावर टीका करत असदुद्दीन ओवेसी यांनी हे वक्तव्य केलं होतं.