शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

सरकारला अस्थिर, तर मला बदनाम करण्याचा डाव

By admin | Updated: February 22, 2016 03:43 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असंतुष्ट एनजीओ आणि काळाबाजार करणाऱ्यांवर टीका करीत आरोप केला की, सरकारला अस्थिर तर मला बदनाम करण्याचा कट केला जात आहे.

बारगढ (ओडिशा) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असंतुष्ट एनजीओ आणि काळाबाजार करणाऱ्यांवर टीका करीत आरोप केला की, सरकारला अस्थिर तर मला बदनाम करण्याचा कट केला जात आहे. मात्र, अशा कारस्थानांना न जुमानता मी माझे काम करीत राहणार आहे, असे ते म्हणाले. छत्तीसगढच्या दौऱ्यानंतर ओडिशात बारगढ येथे एका शेतकरी मेळाव्यात बोलताना मोदी म्हणाले की, काही लोक आणखीही हे वास्तव स्वीकारायला तयार नाहीत की, एक चहावाला इसम देशाचा पंतप्रधान झाला आहे. त्यामुळेच या इसमाला बाजूला करण्यासाठी हे लोक कारस्थान करीत आहेत. शेतकऱ्यांसाठी आपल्या सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.

गरिबांसाठी पाच कोटी घरेरायपूर : गरिबांसाठी २०२२ पर्यंत पाच कोटी घरे बांधणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रायपूर येथे रविवारी ‘प्रधानमंत्री आवास योजने’ची कोनशिला बसविताना केली. त्यांनी छत्तीसगडच्या डोंगरगड येथे देशभरातील ३०० गावांच्या विकासासाठी ‘रर्बन मिशन’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन केले. या गावांना विकास केंद्र मानून शहरांप्रमाणे नियोजन केले जाणार असल्याचे सांगतानाच त्यांनी माझे सरकार गरीब, दलित, आदिवासी आणि समाजातील अन्य दुर्बल घटकांसाठी कार्य करीत असल्याची ग्वाहीही दिली. सरकारने गरिबांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने स्वच्छ भारत, रर्बन मिशन यासारख्या विविध योजना आणल्या आहेत. या कार्यक्रमाला छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग आणि केंद्रीय नगरविकासमंत्री वीरेंद्रसिंग उपस्थित होते. पैशाचा तपशील मागताच एनजीओ दुखावले गेले मोदी म्हणाले की, एनजीओ विदेशातून पैसा मिळवीत आहेत आणि सरकार त्याबाबतचा हिशेब मागत आहे. तथापि, जेव्हापासून आम्ही या पैशांचा तपशील मागणे सुरू केले आहे तेव्हापासून सगळे एकजूट झाले आहेत आणि म्हणत आहेत की, ‘मोदींना मारा, ते आम्हाला हिशेब मागत आहेत.’ देशाला हे जाणून घेण्याची आवश्यकता आहे की, जो पैसा आला तो खर्च कुठे झाला? अर्थात, हे कायद्यातच आहे. सर्व एनजीओ आता एकत्र आले आहेत आणि कारस्थान करीत आहेत की, मोदींना कसे संपविता येईल? सरकारला कसे हटविता येईल? आणि मोदींना बदनाम कसे करता येईल? या देशातील आजारावरच्या उपचारासाठी जनतेने मला निवडले आहे. त्यामुळे थांबणार नाही, थकणार नाही आणि झुकणारही नाही. मोदी म्हणाले की, मी जाणून आहे की, विरोधकांना नेमके काय खुपत आहे? मात्र, मी देशाला लुटण्याची आणि बरबाद करण्याची परवानगी देऊ शकत नाही. कशी असेल रर्बन मिशन योजनाचार लगतच्या गावांचा नगरसमूह म्हणून विकास करताना अत्याधुनिक सुविधा पुरविल्या जातील. अशा ३०० ग्रामीण केंद्रांची उभारणी केली जाईल.दरवर्षी १०० केंद्रांचा विकास केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. गावांचा अशा पद्धतीने विकास केल्यास आयुष्याच्या स्तरात खूप मोठा बदल घडून येईल.