शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांनी वाहतुकीचे नियम पाळले असते तर मुलीचा जीव वाचला असता - हेमामालिनी

By admin | Updated: July 8, 2015 12:13 IST

त्या मुलीच्या वडिलांनी वाहतुकीचे नियम पाळले असते तर हा अपघात टळला असता व चिमुकलीचे प्राण वाचले असे सांगत हेमामालिनी यांनी अपघातासाठी त्याच कुटुंबाला जबाबदार ठरवले आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ८ - राजस्थानमधील दौसा येथे झालेल्या कार अपघातात जखमी झालेल्या अभिनेत्री व खा. हेमामालिनी यांनी या अपघातासाठी त्या कुटुंबालाच जबाबदार ठरवले आहे. 'त्या मुलीच्या वडिलांनी जर वाहतुकीचे नियम पाळले असते तर एका चिमुरडीचा जीव वाचला असता' असे ट्विट करत हेमामालिनी यांनी अपघाताचे खापर त्या कुटुंबावरच फोडले आहे. 

गेल्या आठवड्यात हेमामालिनी आग्रा येथून जयपूरला जात असताना दौसा येथे त्यांच्या मर्सिडीजने अल्टो कारला उडवले. या धडकेत अल्टो कारमधील चार वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी अंत झाला तसेच हेमामालिनींसह पाच  जखमी झाले. हेमामालिनी यांच्यावर फोर्टिस रुग्णालयात उपचार करण्यात आले.
प्रकृती सुधारल्यानंतर हेमामालिनी यांनी ट्विटरवरून त्या अपघाताचे खापर मृत मुलीच्या कुटुंबियांवरच फोडले. 'या अपघातात हकनाक जीव गमवावा लागलेल्या त्या चिमुरडीसाठी व अपघातातील जखमींसाठी मला  वाईट वाटते. जर त्या चिमुरडीच्या वडिलांवनी वाहतुकीचे नियम पाळले असते तर हा अपघाता टळला असता आणि त्या चिमुकल्या बालिकेचे प्राणही वाचले असते' असे ट्विट त्यांनी केले आहे. तसेच आपल्या प्रकृतीसाठी प्रार्थना करणा-या चाहत्यांचे आभार मानत आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणारी मीडिया व इतर काही लोकांवरही हेममालिनी यांनी जोरदार टीका केली. 
दरम्यान या अपघाताप्रकरणी हेमामालिनी यांच्या कारचालकाविरोधात अतिवेगाने गाडी चालवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.