शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

...तर बिल्डरला द्यावे लागेल 11 टक्के व्याज

By admin | Updated: November 1, 2016 14:02 IST

प्रकल्प पूर्ण करण्यास वेळ लावून गृहखरेदीदारांना ठरावीक मुदतीत घरांचा ताबा न देणाऱ्या बिल्डरांना दरमहा 10.9 टक्के दराने व्याज द्यावे लागणार आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. 1 - प्रकल्प वेळेत पूर्ण न करणाऱ्या बिल्डरची आता खैर नाही. प्रकल्प पूर्ण करण्यास वेळ लावणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांविरोधात कठोर भूमिका घेताना केंद्र सरकारने  सोमवारी स्थावर मालमत्ता कायद्याच्या (आरइआरए) अंमलबजावणीसाठी अधिसूचित केले असून, त्यानुसार प्रकल्प पूर्ण करण्यास वेळ लावून गृहखरेदीदारांना ठरावीक मुदतीत घरांचा ताबा न देणाऱ्या बिल्डरांना दरमहा 10.9 टक्के दराने व्याज द्यावे लागणार आहे.  
या नियमानुसार जर गृहखरेदीदाराने आपली गुंतवणुक परत करण्याची मागणी केल्यास बिल्डरला ती रक्कम याच व्याजदरासह ग्राहकाला परत करावी लागणार आहे. तसेच गुंतवणूक परत करण्याची मागणी केल्यापासून 45 दिवसांच्या आत बिल्डरला ही रक्कम परत करावी लागणार आहे. दरम्यान, सरकारने गृहखरेदीदारांच्या रकमेसाठी ठरवलेला व्याजदर हा स्टेट बँकेच्या व्याजदरांपेक्षा दोन टक्क्यांनी अधिक आहे. 
आता हा कायदा अधिसूचित झाला आहे. त्यामुळे प्रत्येक बांधकाम  व्यावसायिकाला राज्य नियामकाकडे नोंदणी करावी लागणार आहे. चालू प्रकल्पांसाठी गोळा केलेल्या रकमेपैकी 70 टक्के रक्कम विकासकांना रजिस्ट्रेशनसाठी अर्ज केल्यापासून 3 महिन्यांच्या आत स्वतंत्र बँक खात्यात जमा करावी लागेल. तसेच तिचा वापर करता येणार नाही.  
या कायद्यामुळे ग्राहकांकडून रक्कम गोळा करून ती अन्य ठिकाणी वळवणाऱ्या विकासकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. तसेच नव्या नियमामुळे रक्कम जमा करण्यास उशीर झाल्यास लागणाऱ्या 15 व्याजापासूनही गृहखरेदीदारांना दिलासा मिळणार आहे.  
(